अफगानिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. मात्र तालिबानने अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाला भरोसा दिला आहे की, ते क्रिकेटमध्ये कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत. असे असले तरी अफगानिस्तानच्या क्रिकेटपटूंना याच्यावर विश्वास बसलेला नाही. ते देशाच्या क्रिकेट भविष्याबद्दल चिंतेत दिसत आहेत. एका दिवसापूर्वीच अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नवीन चेयरमनची नियुक्ती केली आहे. तरीदेखील खेळाडू घाबरलेले आहेत. अफगानिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक याने त्याच्या सहकारी खेळाडूंच्या स्थितीविषयी सांगितले आहे. त्यात त्याने सांगितले आहे की, खेळाडूंच्या मनात अजूनही तालिबानविषयी भीती आहे.
हकने बीबीसी रेडिओला मुलाखत दिली. मुलाखतीत त्याने सांगितले की, “अफगानिस्तानमध्ये लोकं क्रिकेटवर प्रेम करतात. ही एकमात्र अशी गोष्ट आहे जी यांना एकत्र खुश होण्याची संधी देते. तालिबान शासनाच्या काळात खेळाचे भविष्य धोक्यात आहे. खेळाडूंच्या डोळ्यात, त्यांच्या आवाजात आणि त्यानी दिलेल्या संदेशात तालिबानविषयी भीती दिसत आहे. तालिबानने जरी म्हटले असले की, ते खेळाडूंना कसलाच त्रास देणार नाहीत. तरी पुढे काय होईल कोणालाच माहित नाही.”
तो पुढे बोलताना म्हणाला की, “जर कोणती चांगली बातमी मिळत असेल, तुम्हाला सर्वांना एकत्र आनंद साजरा करता येत असेल तर त्याचे माध्यम क्रिकेट आहे. अफगानिस्तानसाठी क्रिकेट एवढे गरजेचे आहे. क्रिकेट या देशासाठी केवळ खेळ नाहीये, हे त्याच्यापेक्षा जास्त आहे.” हक सध्या वेस्टइंडीजमध्ये आहे. तो गयाना अमेजॉन वाॅरियर्ससाठी कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये भाग घेणार आहे.
सद्यस्थितीत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे कठीण
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेला परवानगी दिली आहे. असे असले तरी हकसाठी देशात जे काही घडत आहे, त्यामुळे त्याच्या खेळावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत देशात जी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे. त्याचे म्हणणे आहे की, “माझ्यासाठी फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करणे कठीण आहे.”
देशात जे चालू आहे त्याला विसरू शकत नाही
हकने म्हटले, “तुम्ही क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी १ किंवा २ मिनिट विसरू शकता की, देशात काय चालू आहे. मात्र, पुन्हा तेच तुमच्या डोक्यात सुरू होते. मी असे नाही म्हणू शकत की, मी पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. तुम्ही जेव्हा तुमच्या देशाला अशा परिस्थितीत पाहता; तेव्हा तुम्ही असे करू शकत नाही.”
अफगानिस्तानला पुढच्या महिन्यात पाकिस्तानसोबत ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही मलिका श्रीलंकेत आयोजित केली गेली होती. मात्र आता ही मालिका पाकिस्तानात होणार असल्याचे समजत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजच्या एकाहून एक सरस गोलंदाजांना पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने दिल्या टिप्स, खेळाडूंना फुटलं हसू
फवाद आलमच्या शतकामागे आईचा आशीर्वाद, सामन्यापूर्वी फोनवर म्हणाली होती असं काही
सूर्या-पृथ्वीची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी पाहण्याची सर्वांनाच आतुरता, पण नेमकं कोणाच्या जागी खेळवणार?