बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघात सध्या सुरु असलेल्या तिरंगी टी20 मालिकेत रविवारी(15 सप्टेंबर) अफगाणिस्तानने बांगलादेश विरुद्ध 25 धावांनी विजय मिळवला.
अफगाणिस्तानचा हा आंतरराष्ट्रीय टी20 मधील सलग 12 वा विजय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विक्रम अफगाणिस्तानने केला आहे.
त्यांनी फेब्रुवारी 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत सलग 12 टी20 विजय मिळवले आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या झिम्बाब्वे विरुद्ध 3, आयर्लंड विरुद्ध 5 आणि बांगलादेश विरुद्ध 4 विजयांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे हा विक्रम करताना अफगाणिस्तानने त्यांचाच विक्रम मागे टाकले आहे. याआधीही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्याच नावावर होता. त्यांनी मार्च 2016 ते मार्च 2017 दरम्यान सलग 11 टी20 सामन्यात विजय मिळवले होते.
रविवारी बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडलेल्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या होत्या. तसेच बांगलादेशसमोर विजयासाठी 20 षटकात 165 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 19.5 षटकात सर्वबाद 139 धावाच करता आल्या.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणारे संघ –
12 विजय – अफगाणिस्तान (2018-2019)*
11 विजय – अफगाणिस्तान (2016-2017)
9 विजय – पाकिस्तान (2018)
8 विजय – इंग्लंड (2010 -2011)
8 विजय – आयर्लंड (2012)
8 विजय – पाकिस्तान (2018)
Afghanistan have broken their own record of the longest winning streak in Men's T20I cricket 🙌 pic.twitter.com/k4kX20Y3VG
— ICC (@ICC) September 16, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रवी शास्त्री म्हणतात, स्वत:लाच नाही तर संघालाही निराश करत आहे हा खेळाडू…
–तब्बल ४७ वर्षांनंतर ऍशेस मालिकेत घडली ‘ही’ गोष्ट
–प्रो कबड्डीत कोणालाही न जमलेला ‘तो’ विक्रम परदीप नरवालने करुन दाखवला!