यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8 सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघानं 8 धावांनी बांगलादेश संघाचा धुव्वा उडवला. अफागाणिस्तान संघानं या विजयासह सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. परंतू या सामन्यादरम्यान अफगाणिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक जोनाथन ट्राॅट अफगाणिस्तान संघाचं खराब क्षेत्ररक्षण पाहून भडकले.
टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं चमकदार कामगिरी केली. त्यांनी या विश्वचषकात 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला. परंतू सुपर 8 मधील बांगलादेशविरुद्धचा सामना हा खूप रोमांचक पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यानं अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्राॅट हे संघाचं खराब क्षेत्ररक्षण पाहून भडकले आणि कचराकुंडीला जोरात लाथ मारली. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
Us Jonathan Trott😭😭 pic.twitter.com/Vaoa16cCAl
— Ayush Tomar (@ayush_tomar8) June 25, 2024
परंतू अफगाणिस्तान संघानं जेव्हा हा सामना जिंकला त्यावेळी जोनाथनं ट्राॅट यांनी खूप जल्लोष केला. जोनाथन ट्राॅट यांनी अफगाणिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अफगाणिस्तान संघाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढा हातभार कर्णधार राशिद खाननं लावला. तेवढचं जोनाथन ट्राॅट यांनी सहकार्य केलं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानसाठी नवीन उल हकनं (Naveen-ul-Haq) 4 बळी घेतले तर कर्णधार राशिद खाननं (Rashid Khan) 3 बळी घतले. अफगाणिस्तानसाठी फलंदाजी करताना सलामीवीर रहमानुल्ला गुरबाजनं (Rahmanullah Gurbaz) 55 चेंडूत सर्वाधिक 43 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 3 चौकार तर 1 उत्तुंग षटकार ठोकला. तर कर्णधार राशिद खाननं 10 चेंडूत 19 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत त्यानं 3 खणखणीत षटकार ठोकले.
बांगलादेशसाठी 116 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर यष्टीरक्षक लिटन दासनं (Litton Das) 49 चेंडूत नाबाद सर्वाधिक 54 धावांची खेळी खेळली. परंतु त्याला बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी 8 धावांनी सामना गमावला. तर अफगाणिस्ताननं या सामन्यात वर्चस्व गाजवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. अफगाणिस्तान संघ आता (26 जून) रोजी सेमीफायनल 1 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार हॉकीपटूंच्या मैत्रीपूर्ण सामन्याने भरले अनोखे रंग
फक्त 20 दिवसांत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने, पहा वेळापत्रक
ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या विदेशी मंत्र्याने राशिद खानला फोन करुन दिल्या शुभेच्छा..!