के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या सहाव्या दिवशी झालेल्या सामन्यात पालघर काझीरंगा रहिनोस, कोल्हापूर ताडोबा टायगर्स, अहमदनगर पेरियार पँथर्स व मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघानी प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले. आजचा पहिला सामना अतिशय रोमहर्षक झाला. अटीतटीचीच्या लढतीत पालघर संघाने रायगड संघा विरुद्ध 36-34 असा शेवटच्या चढाईत विजय मिळवला. पालघर संघाचा कर्णधार राहुल सवर पुन्हा एकदा ‘कबड्डी का कमाल’ बक्षिसाचा मानकरी ठरला.
आजच्या दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने 55 गुणांनी लातूर विजयनगारा विर्स संघाचा धुव्वा उडवला. तेजस पाटील ने आज तर रेकॉर्ड करण्याचा धडाकाच लावला होता. त्याने सहाव्याच सामन्यात 100 गुणांचा टप्पा पार केला तर के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या एकाच सामन्यात सर्वाधिक चढाईत 30 गुण मिळवत विक्रम केला. कोल्हापूर संघाच्या या विजयाने त्याचा टॉप 4 मध्ये राहण्याच्या आशा कायम आहेत.
आजच्या तिसऱ्या सामन्यात अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने पुणे पलानी टस्कर्स संघाचा 43-22 पराभव करत आपला झंझावात सुरूच ठेवला. तर अहमदनगरच्या शिवम पटारे ने सहाव्या सामन्यात सहावा सुपर टेन पूर्ण केला. शेवटच्या सामन्यात मुंबई उपनगर संघाने सांगली सिंध संघावर 45-28 असा विजय मिळवत या ‘अ’ गटात दुसरा स्थान निश्चित केल.
उद्या 5 एप्रिल 2023 रोजी ‘अ’ गटातील शेवटचे सामने होणार असून पुणे विरुद्ध लातूर सामना पुणे संघाला जिंकणे महत्वपुर्ण असेल. तर रायगड विरुद्ध कोल्हापूर संघात महत्वपूर्ण लढत होईल जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये आपले स्थान पक्का करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: तेजतर्रार नॉर्किए पुढे पस्त गुजरातचे ओपनर! 149 KMPH वेगाने उखडले स्टंप्स
यत्र तत्र सर्वत्र धोनी! तब्बल इतक्या कोटींचा टॅक्स भरत पार पाडली सामाजिक जबाबदारी