भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या बरेच चर्चेत आहेत. यामागे भारतीय संघात झालेले अनेक फेरबदल हे मुख्य कारण आहे. तसेच त्यानंतर सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांनी नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्याचे पडसाद आता सोशल मीडियावरही दिसून येत आहेत.
काही दिवसांपूर्वी विराटने टी२० भारतीय संघाचे नेतृत्त्व सोडले होते. त्यामुळे रोहित शर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच विराटला बीसीसीआयने वनडे कर्णधारपदावरून हटवत रोहित मर्यादित षटकांचा कर्णधार बनवले आणि विराटकडे केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद ठेवण्यात आले.
या फेरबदलानंतर अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. त्यातच गांगुलीने सांगितले की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्हाला २ वेगवेगळे कर्णधार नको होते, त्यामुळे विराटला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. तसेच त्याने असे देखील सांगितले की बीसीसीआयकडून विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते. मात्र, विराट त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्यानंतर त्याला वनडे नेतृत्त्त्वावरूनही हटवले गेले.
मात्र, याच्या विरुद्ध भाष्य विराट कोहलीने (Virat Kohli) केले. भारतीय संघाला आगामी काळात दक्षिण आफ्रिकेमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी गुरुवारी (१६ डिसेंबर) भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. त्यापूर्वी बुधवारी विराट पत्रकार परिषदेसाठी (Virat Press Conference) हजर होता. यावेळी त्याने अनेक खुलासे केले.
विराटने सांगितले की वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय त्याला दीडतास आधी कळला होता. तसेच जेव्हा त्याने टी२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा बीसीसीआयकडून त्याचे स्वागत झाले होते आणि त्याला कोणीही टी२० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले नव्हते. याशिवाय तो असेही म्हणाला की, त्याने टी२० कर्णधारपद सोडताना त्याने वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्त्व तो करत राहाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
या वक्तव्यांमुळे विराट विरुद्ध गांगुली (Virat vs Ganguly) अशी परिस्थिती उभी राहिली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं, असे प्रश्न विचारले जात आहेत. यामुळे सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने हा ‘बीसीसीआयचा मामला आहे, आम्ही त्याला हाताळू. मला याबद्दल काहीही बोलायचे नाही,’ असे उत्तर दिले.
यानंतर शुक्रवारी (१७ डिसेंबर) #WorldStandsWithKohli आणि #NationStandsWithDada असे हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाले. विराटला सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणात पाठिंबाही मोठ्या प्रमाणात मिळताना दिसत आहे.
105K Tweets and Counting..!! 🔥👊
Another Unplanned Successful trend..!! Thanks to each one of You participated…!! शाबाश..!!👍#WorldStandsWithKohli @imVkohli pic.twitter.com/lK7V1Svh5p
— 𝐒𝐚𝐮𝐫𝐚𝐛𝐡 𝐓𝐫𝐢𝐩𝐚𝐭𝐡𝐢 (@SaurabhTripathS) December 17, 2021
https://twitter.com/VamshiMb/status/1471776382619250690
https://twitter.com/sumit_vk18_/status/1471850461112127488
Wait wait wait 26th dec is coming dada 😎
#WorldStandsWithKohli pic.twitter.com/qWJB6Oq1Iu— vírαt_fan_girl18 (@RupaKum70328018) December 18, 2021
Wax statue at london ✅
Wax statue at dubai ✅
Wax statue at Sydney ✅ #WorldStandsWithKohli pic.twitter.com/mHWfrRyrZH— king kohli ⚔️ (@kingkohliera1) December 17, 2021
They are messing up with wrong fanbase 🔥🤫
Virat fc mass 🔥#WorldStandsWithKohli pic.twitter.com/NsVCgXw2Sg— Anjali Sharma (@Anjali_vk_18) December 17, 2021
#NationStandsWithDada
Legends
this generation kids only know trolling they are nibbas pic.twitter.com/qqBWm9TnQs— Kranthi Reddy (@Kranthi146reddy) December 16, 2021
He is the founder of that grit and aggression which you guys talk about .#NationStandsWithDada pic.twitter.com/1m81DVHsem
— 𝗧𝘂𝗸𝗧𝘂𝗸 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆 (@TukTukAcademy_) December 17, 2021
सध्या विराट भारतीय संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour of South Africa) आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सामन्यांना २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ५०५ मिनिटे फलंदाजी अन् ९९ धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर
अश्विन भलताच चिडला होता; तर द्रविड सगळ्यांची घेत होता फिरकी, पाहा टीम इंडियाचं अफलातून फूटबाॅल सेशन
हरभजनच्या गोलंदाजीवर अमिताभ बच्चन यांची फटकेबाजी अन् इरफानची कॉमेंट्री, व्हिडिओ व्हायरल