आयपीएल २०२२ हंगामात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच सक्रिय झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मिचेल मार्शला आणि त्यांच्या संघातील सपोर्ट स्टाफच्या काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी समोर येताच आयपीएलचा चालू हंगाम रद्द करण्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नेटकरी यानंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर निशाणा साधत आहेत.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएलमधील असे दोन संघ आहेत, ज्यांचे चालू हंगामातील प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहेत. अशात आयपीएलचा चालू हंगाम रद्द केला गेला, तर या दोन संघाच्या चाहत्यांना जास्त आनंद होईल. नेटकरी आता हा मुद्दा उचलून धरत आहेत आणि या दोन संघांच्या चाहत्यांना ट्रोल करत आहेत. मुंबईने चालू हंगामात त्यांचे सुरुवातीचे लागोपाठ ६ सामने गमावले आहेत, जे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात खराब प्रदर्शन ठरले आहे. तर दुसरीकडे सीएसकेने सुरुवातीच्या ६ सामन्यांपैकी फक्त एक जिंकला आहे. गुणतालिकेत हे दोन्ही संघ अनुक्रमे १० आणि ९ व्या क्रमांकावर आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा विचार केला, तर त्यांचा संघ सोमवारी (१८ एप्रिल) पुण्यासाठी रवाना होणार होता. पण ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शला कोरोना झाल्यानंतर संघ मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाला आहे. आता पुढच्या दोन दिवसांपर्यंत या खेळाडूंच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत.
सोशल मीडियावर उमटलेल्या अशा प्रतिक्रिया –
Cancel ipl is trending
Meanwhile CSK and mi fans pic.twitter.com/PrCgMOdlfn— Gourav Joshi (@Iam_Gouravjoshi) April 18, 2022
GT and LSG fans started protest after Cancel IPL starts trending on twitter 😂 pic.twitter.com/fumNZemhc6
— Bandhu Agrawal (@bandhu_agrawal) April 18, 2022
Cancel IPL is trending on twitter
Meanwhile me as a CSK Fan 😂 pic.twitter.com/Q9N35wC9fD— Bandhu Agrawal (@bandhu_agrawal) April 18, 2022
MI and CSK fans coming together in support of cancel IPL pic.twitter.com/xOKYeV6OnM
— Hemank (@Hemank_fpl) April 18, 2022
मुंबई आणि सीएसकेचेच्या चाहत्यांसाठी आयपीएलचा चालू हंगाम रद्द होणे फायद्याचे असले, तरी दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघांना ही गोष्ट माहागात पडू शकते. गुजरातने हंगामातील सुरुवातीच्या ६ सामन्यांपैकी ५ जिंकले आहेत आणि संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच राजस्थानने त्यांच्या सुरुवातीच्या ६ सामन्यांपैकी ४ जिंकले आहेत आणि संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बिंग ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या दिल्ली वि. पंजाब IPL सामन्याचे ठिकाण बदलले, कोरोना ठरलंय कारण
गरमागरमी! फिंच बाद होताच प्रसिद्ध कृष्णाबरोबर झाला वाद, मग गोलंदाजानेही दिले प्रत्युत्तर, पाहा Video
श्रेयस अय्यरचे केकेआरचा प्रशिक्षक मॅक्युलमशीच झाले भांडण? Video व्हायरल