चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आता फक्त काही आठवडे दूर आहे. त्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट संघ चांगलाच चर्चेत आला आहे. प्रथम इंग्लंड आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. खरं तर, दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेन्झी यांनी त्यांच्या संघाला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना न खेळण्याची विनंती केली आहे. हे सर्व घडण्यामागचे कारण म्हणजे, 2021 मध्ये तालिबान सरकार परतल्यानंतर महिलांना क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
मॅकेन्झी म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की आयसीसीचा सर्वांप्रती समान दृष्टिकोन आहे. ते सर्व देशांमध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटवर भर देण्याचा प्रयत्न करते, परंतु अफगाणिस्तानात असे घडत नाही. यावरून हे स्पष्ट होते, क्रीडा प्रशासनात राजकीय हस्तक्षेप आहे”. अशाच एका प्रकरणात, 2023 मध्ये श्रीलंकेला बंदी घालण्यात आली होती.
मॅकेन्झी यांनी त्यांच्या निवेदनात पुढे म्हटले की, “मला माहिती आहे की आयसीसी हा नियम पाळते की खेळांमध्ये कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप नसावा. मी क्रीडा मंत्री आहे, परंतु हा निर्णय घेणे माझ्या अधिकारात नाही” दक्षिण आफ्रिका भविष्यात अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळले पाहिजेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने जगात महिला सक्षमीकरणाकडे चांगला संदेश जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
🚨 SPORTS MINISTER CALLS FOR BOYCOTT IN CT 2025. 🚨
– South African Sports Minister wants South Africa to boycott the match against Afghanistan to take a firm stand with women. pic.twitter.com/TYWh6ZAcw7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 9, 2025
यापूर्वी, इंग्लंडच्या 160 खासदारांनी ईसीबीला पत्र लिहून महिला हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत अफगाणिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. ही मागणी ईसीबीने फेटाळून लावली, कारण एका मंडळाने या प्रकरणात आवाज उठवल्याने काहीही साध्य होणार नाही, परंतु सर्वांना एकत्र यावे लागेल.
हेही वाचा-
‘रिषभ पंत बाहेर, केएल राहुल…’, इंग्लंड मालिकेसाठी क्रिकेट पंडित संजय मांजरेकरांनी निवडला संघ
‘हे खरं असू शकतं किंवा…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युझवेंद्र चहलची खळबळजनक पोस्ट व्हायरल
नितीश कुमार रेड्डीचं भारतात जल्लोषात स्वागत, ढोल-ताशांच्या आवाजानं दुमदुमलं विमानतळ; VIDEO पाहा