आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व संघांनी आपली रणनिती आखली असून आता आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्याची सर्व वाट पाहत आहेत. तर बीसीसीआयने वेळापत्रकही जाहीर केलं असून येत्या 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. त्याआधी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
याबरोबच आयपीएलपूर्वी चाहत्यांना एक झटपट लीगचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी त्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर ही लीग फक्त 90 चेंडूंची असणार आहे. अशा स्थितीत या लीगमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडणार आहे. तर या लीगमध्ये भारतासह इतर अनेक देशांचे महान खेळाडू खेळताना पहायला मिळणार आहेत. तसेच आयपीएलबाबत चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ पाहता जगभरात अनेक प्रकारच्या लीग सुरू झाल्या आहेत.
यापूर्वी, द हंड्रेड लीग इंग्लंडमध्ये सुरू झाली होती, ज्यामध्ये एक संघ आपल्या डावात फक्त 100 चेंडू खेळत होता. त्यानंतर आता फक्त 90 चेंडूंची लीग होणार आहे. त्यामुळे या लीगमध्ये 15-15 षटकांचा सामना होणार आहे. तसेच या क्रिकेट लीगचे नाव लेजेंड्स क्रिकेट टूर्नामेंट आहे, जी श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 8 मार्चपासून सुरू होणार आहे. या लीगचा अंतिम सामना 19 मार्च रोजी होणार आहे. तर प्रत्येक संघातील कोणताही एक गोलंदाज जास्तीत जास्त 3 षटके टाकू शकणार आहे.
March 3rd Tho IVPL League Ends
From March 8Th -20 Legends Cricket League Begins 🩷
Get Ready We Will Enjoy & Celebrate Each & Every Presence Of Our IDOL#SureshRaina | @ImRaina pic.twitter.com/bEHyaTAO0h
— SHANNU 🇮🇳 (@Shannu39) March 1, 2024
अशातच भारतीय संघाचा माझी अष्टपैलू युवराज सिंग, स्फोटक फलंदाज सुरेश रैना, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल याशिवाय अनेक तगडे फलंदाजही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या दिग्गजांना एकत्र खेळताना पाहण्याची संधी मिळणार असल्याने ही स्पर्धा खूपच रोमांचक होणार असल्याचे समोर आले आहे.
Legend's League T20
Legend's League Masters
US Masters T10
Veteran's League (IVPL)
Legend's Cricket Tournament
Road Safety SeriesHow Many More Such Leagues are there ??
Why Raina is playing All of these , if he wants he can easily get BPL deal atleast
— Tanmoy Chakraborty🩺⚕️ (@Tanmoycv01) February 26, 2024
दरम्यान, या लीगमध्ये एकूण 7 संघ सहभागी होणार आहेत, ज्यात दुबई जायंट्स, राजस्थान किंग्स, दिल्ली डेव्हिल्स, कँडी सॅम्प आर्मी, पंजाब रॉयल्स, एनवाय सुपरस्टार्स स्ट्रायकर्स आणि कोलंबो लायन्स यांचा समावेश आहे. तसेच 8 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 19 मार्चपर्यंत एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –