महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 194 धावा ठोकल्या होत्या. तसेच स्मृतीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 195 धावांचा पाठलाग करताना झंझावाती खेळी केली आहे. या खेळीमध्ये विराट कोहली आणि स्मृती मानधनाचे एक कनेक्शन जुळून आले आहे. तसेच हे कनेक्शन महिला प्रीमियर लीग आणि आयपीएलशी संबंधीत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे विराट कोहली आणि स्मृती मानधनाचे कनेक्शन.
भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि स्मृती मानधना हे दोघेही भारतीय संघाची शान आहेत. तसेच विराट कोहली हा पुरुष क्रिकेटचा बादशाह आहे, तर स्मृती मानधना ही महिला क्रिकेटची राणी आहे. तसेच विराट कोहली आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे, तर स्मृती मानधना वुमन्स प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि विशेष बाब म्हणजे या दोन्ही खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत असतात.
याबरोबरच विराट कोहली आणि स्मृती मानधना दोघेही जर्सी नंबर 18 घालून खेळतात आणि दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी तसेच त्यांच्या फ्रेंचायझी संघासाठी खूप महत्त्वाच्या भूमिका बजावताना पहायला मिळत असतात. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2008 मध्ये त्यांचा संघात समावेश केला होता, परंतु पहिल्या हंगामात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात विराट कोहलीने बेंगळुरूच्या तिसऱ्या सामन्यात डेक्कन चार्जर्सविरुद्ध ३२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. तसेच स्मृती मंधानानेही महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात डब्ल्यूपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले आहे. तर यावेळी मंधानाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. तसेच मंधानाला पहिल्या हंगामात एकही अर्धशतक करता आले नव्हते.
Virat Kohli 🤝 Smriti Mandhana 1️⃣8️⃣#RCB #IPL2024 #ViratKohli #SmritiMandhana pic.twitter.com/VYUDuckzde
— Jega8 (@imBK08) February 29, 2024
दरम्यान, विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्यातील तिसरे कनेक्शन म्हणजे दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावूनही त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर विराट कोहली आणि स्मृती मानधना या दोघांनीही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच मंधानाने 2019 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या T20I सामन्यात पहिल्यांदा भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते.
महत्वाच्या बातम्या –
- भारतीय क्रिकेटपट्टूकडून मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप, म्हणाला, विकेट असे पडत होते की…
- IND vs ENG : घ्या जाणून भारतीय संघाचा धर्मशाला स्टेडियममध्ये कसा आहे रेकॉर्ड? कोण मारेल बाजी, वाचा सविस्तर