आयपीएल 2024 चा फायनल सामना रविवारी (26 मे) रोजी खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यामध्ये चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. 12 वर्षांनंतर केकेआरनं चेन्नईच्या मैदानावरती फायनल जिंकून इतिहास रचला. 2012 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं चेन्नईला पराभूत करुन पहिलं विजेतेपद पटकावलं होत.
आयपीएल 2024 चा फायनल सामना देखील याच मैदानावर खेळला गेला. परंतु केकेआरच्या पुढे चेन्नईचा संघ नव्हता. केकेआरपुढे सनरायझर्स हेदराबादचं आव्हान होत. परंतु चेन्नईचे चाहते मैदानावर खूप होते. केकेआरनं हेैदराबादचा एकतर्फी पराभव करत फायनल सामना जिंकला. आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्या वेळेस ट्राॅफीवरती त्याचं नाव कोरलं. केकेआरनं आतापर्यंत तीन विजेतेपद पटकावले आहेत. त्यामध्ये ( 2012, 2014, 2024) या तीन वर्षी त्यांनी विजेतेपदाचा मान मिळवला.
केकेआरनं फायनल सामना जिंकल्यांनंतर संघ मालक शाहरुख खाननं चेन्नईच्या चाहत्यांसमवेत चेन्नई.. चेन्नईचे नारे दिले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यादरम्यानं मुलगी सुहाना आणि गौरी खान व मुलगा अबराम शाहरुख खानच्या पाठीमागे उभे होते. शाहरुखनं जेव्हा चेन्नईचे नारे लावले. त्यावेळी त्याची मुलगी सुहाना आणि गौरी खान व मुलगा अबराम हसायला लागले. याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan chanting “CSK, CSK, CSK” with the fans at Chepauk after the final. 💛 [AKDFA Official Instagram]
– This is beautiful gesture by SRK.pic.twitter.com/EBxfLaWeff
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2024
सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वाधिक २४ धावा केल्या. आंद्रे रसेलनं 3, मिचेल स्टार्क आणि हर्षित राणाने प्रत्येकी 2 गडी बाद केले. कोलकाता संघाने 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकात मात्र 2 गडी गमावून पूर्ण केलं. व्यंकटेश अय्यरनं 26 चेंडूत 52 धावांची आक्रमक खेळी खेळली. तर सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने 39 धावा करत संघाला मोलाचं योगदान दिलं.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ‘गब्बर’ दिसणार बिग बॉस मध्ये? वैवाहिक जीवन आहे खूप वादळी
रहमानउल्ला गुरबाजच्या आईचं स्वप्न पूर्ण! विजयानंतर म्हणाला, “मला वाटते की माझी आई…”
शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द