भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सोमवारी (11 सप्टेंबर) अखेर निकाली निघाला. या सामन्यात भारताने तब्बल 228 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तान संघाचे गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे या सामन्याक दुपळे दिसत होते. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटचे जाणकार आपली वेगवेगळी मते व्यक्त करत आहे. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही खास प्रतिक्रिया दिली.
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने आपल्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अख्तरच्या मते भारत आणि पाकिस्तान संघातील या सोमांचक सामन्यात पाकिस्तानने एक मोठी चूक केली. ही चूक होती नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय. कारण कोलंबोतीय स्टेडियमवर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पण बाबर आझम (Babar Azam) याने प्रथम गोलंदाजी घेऊन भारताला वर्चस्व मिळवण्याची संधी दिली, असे अख्तरला वाटते.
अख्तर म्हणाला, “हा खूपच लाजिरवाणा पराभव आहे. हे विचार करण्यासारखे आहे की, पाकिस्तानने फलंदाजीसाठी एवढ्या चांगल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. मला हा खूपच अनोखा निर्णय वाटला. असे असले तरी, फक्त एका खराब प्रदर्शनामुळे आपण पाकिस्तान संघाला कमी लेखू शकत नाही. भारतीय संघासाठीही हीच गोष्ट लागू होते.”
दरम्यान, उभय संघांतील हा सामना रविवारी (10 सप्टेंबर) निकाली लागणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे सोमवारी म्हणजेच राखीव दिवशी सामना खेळवला गेला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्सच्या नुकसानावर 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 32 षठकांमध्ये 128 धावा करून सर्वबाद झाला. भारतासाठी विराट कोहली (122*), केएल राहुल (111*) आणि कुलदीप यादव (5 विकेट्स) या तिघांनी सर्वात्तम प्रदर्शन केले. (After losing against India, Shoaib Akhtar proved Babar Azam wrong)
महत्वाच्या बातम्या –
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी
जोडी जबरदस्त! श्रीलंकन गोलंदाजांना चोपत रोहित-गिलने बनवला विश्वविक्रम