---Advertisement---

हसी अन् बालाजी कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंवरही कोरोनाचे सावट

On: बुधवार, मे 5, 2021 11:05 PM
---Advertisement---

भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या या विळख्यात केवळ सामन्य जनताच नाही तर मोठमोठे सेलिब्रेटी, खेळाडूही अडकले आहेत. त्याच देशात हे संकट अचानक मोठे होण्याच्या काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली होती. पण हा हंगाम सुरु झाल्यानंतर देशातील कोरोना संकटाचा धोकाही अचानक वाढला. परिणामी अखेर आयपीएलच्या या हंगामाला स्थगिती द्यावी लागली आहे.

संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव 
आयपीएल २०२१ चा हंगाम सुरु असताना २ मेनंतर अचानक संघांच्या बायोबबलमधील कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर येऊ लागली. सर्वप्रथम ३ मेला कोलकाता नाईट रायडर्सचे २ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघांतील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अखेर मंगळवारी आयपीएलचा हा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चेन्नईच्या या खेळाडूंवर संकट
चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सध्या चेन्नई संघातील खेळाडूंवर कोरोनाच्या संकटाचे काळे ढग आहेत. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार हसी मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी चेन्नई संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने सुरेश रैना आणि फाफ डू प्लेसिसबरोबर १५-२० मिनिटे वेळ घालवला. याबरोबरच तो बाकी खेळाडूच्या संपर्कातही होता.

तसेच सोमवारी बालाजीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तो देखील काही खेळाडूंच्या संपर्कात आला होता. पण बालाजी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच चेन्नईचा संपूर्ण संघ आयसोलेट झाला होता. याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने माहिती दिली होती.

अन्य संघांनाही कोरोनाचा फटका
गेल्या काही दिवसात आयपीएलमधील केवळ चेन्नई सुपर किंग्सलाच नाही तर अन्य संघांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. हसीपूर्वी मंगळवारी (४ मे) सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

तसेच त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमचे ५ कर्मचारी यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल स्थगितीनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या मायदेशी परण्याबद्दल दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

आयपीएल २०२१ पूर्ण हो न होवो, खेळाडूंना मिळणार पगाराचे पूर्ण ४३८ करोड; वाचा पूर्ण माहिती

कर्णधाराच्या जवळच्या व्यक्तींना मिळते संघात जागा, पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---