ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या मालिकेला बॉर्डर गावसकर ट्रॉफी असे नाव असून मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ देखील घोषित केला गेला आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी मात्र हा भारत दौरा दिवसेंदिवस अधिक अवघड होताना दिसत आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. अशातच आता वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने देखील पहिल्या कसोटीतून माघार घेतली.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांनी पहिल्या कसोटी सामन्यात माघार घेतल्यानंतर जोश हेडलवूड (Josh Hazelwood) याच्याकडून संघाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून हेजलवूडनेही माघार घेतली. अशात आता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins ) याच्याकडे वेगवान गोलंदाजांचे जास्त पर्याय शिल्लक राहिले नाहीत. अशात स्कॉट बोलँड (Scott Boland) याला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याव्यतिरिक्त पहिल्या कसोटीत लान्स मॉरिस देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचे एकूण तीन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. प्रथम मिचेल स्टार्क, दुसऱ्या क्रमांकावऱ कॅमरून ग्रीन आणि आता तिसरा खेळाडू म्हणजेच हेजलवूडला दुखापत झाल्याचे समोर येत आहे.
मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. यावेळी सिडनी कसोटी सामन्यात जोस हेजलवुड याला ही दुखापत झाली. याच दुखापतीमुळे हेजलवूड संघाच्या सराव सत्रात जास्त गोलंदाजी करू शकला नाही आणि पहिल्या कसोटी सामन्यातून माघार गेतली. नागपूर कसोटी सामन्याआधी हेजलवूड गोलंदाजीला सुरुवात करू शकले, पण कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट मात्र होऊ शकणार नाही. “सिडनी कसोटीपासून या दुखापतीमुळे मला त्रास होत आहे. पाऊस पडल्यानंतर त्या सामन्यात आम्ही गोलंदाजी केली होती. अशात रनअप घेताना हीलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळेच माझी बॉडी सध्य वर्कलोड घेण्यासाठी तयार नसल्याचे मला समजले,” अशी माहिती स्वतः हेजलवूडकडून मिळाली.
दरम्यान, 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये खेळळा जाईल. उभय संघांतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये सुरू होणार आहे. या दोन सामन्यांमध्ये 3 दिवस वेळ आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हेजलवुडपुढे संघात पुनरागमन करण्याचे आव्हान असेल. हेजलवुडप्रमाणेच मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन देखील दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्द असण्याची शक्यता आहे. ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यात खेळला, तरी गोलंदाजी मात्र करू शकणार नसल्याचे सांगितले गेले आहे. (After Mitchell Starc, Jos Hazlewood also pulled out of the first Test against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बालपणी आर्मीत जाण्याची स्वप्ने पाहणारा भुवी आज आहे भारताचा नामवंत क्रिकेटर, वाचा त्याच्याबद्दल १० खास गोष्टी
‘प्रोपगंडा बंद करा, आमचं त्याच्यावर प्रेम आहे’, टिळा न लावून घेण्याच्या वादावर उमरानचा नवीन फोटो व्हायरल