रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज (ind vs wi) यांच्यात अहमदाबादमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. भारतासाठी हा १००० वा वनडे सामना ठरला. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हटल आहे की, माजी कर्णधार एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघाला अजुन फिनिशर सापडला नाही. एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माला वाटते की, पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ‘फिनिशर’च्या भूमिकेसाठी हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि रवींद्र जडेजा( Ravindra jadeja) यांच्याशिवाय आणखी ‘बॅकअप’ तयार करण्याची अत्यंत गरज आहे.
रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित म्हणाला, “एकदिवसीयमध्ये फिनिशरची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण धोनीच्या निवृत्तीनंतर आम्हाला या स्थानी बसू शकेल असा कोणीच खेळाडू सापडला नाही. आम्ही हार्दिकला घेतले, जडेजा सुद्धा खेळला पण आम्हाला या स्थानासाठी आणखी बॅकअप तयार करण्याची गरज आहे.”
रोहित म्हणाला, “या मालिकेत ज्या खेळाडूंना संधी मिळत आहे, ते या संधीचा फायदा घेतील आणि संघात आपले स्थान मजबूत करतील, अशी आशा आहे. ‘फिनिशर’ हा महत्त्वाच्या टप्प्यावर फलंदाजी करत असतो आणि अनेकदा त्याचे योगदान सामना पलटवू शकते.”
ज्या पद्धतीने तुम्हाला आणि शिखरला २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले गेले होते, तोच दृष्टीकोन आत्ता दिसत असल्याने तुम्ही युवा खेळाडूंना संधी द्याल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रोहित हसत म्हणाला की, “म्हणजे तुम्ही म्हणत आहे की मी आणि शिखर बाहेर पडू आणि इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडला डावाची सुरुवात करायला लावू?”
रोहित म्हणाला, “हो, आम्हाला निकाल मिळाला. मात्र, वरच्या तिघांबद्दल बोलायचे झाले तर, ते गेल्या अनेक वर्षांपासून चांगलीच कामगिरी करत आहेत. त्यामुळे हो, तरुणांना संधी मिळेल आणि इशानला ज्या प्रकारे संधी मिळत आहे, त्याला अजुन संधी मिळत राहतील.
तो पूढे म्हणाला की, “आम्हाला भविष्यात अनेक सामने खेळायचे आहेत. त्यामुळे फलंदाजांना बऱ्याच संधी मिळतील. शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेत चांगली फलंदाजी केली होती, आता त्याला कोविड झाला आहे, ऋतूलाही कोविडची लागण झाली आहे म्हणून इशानला संधी दिली आहे, त्यामुळे तरुणांना संधी मिळत राहतील पण तुम्ही त्या संधीचा उपयोग कसा करताय ही महत्त्वाची गोष्ट आहे.”
महत्वाच्या बातम्या-
यश धूल आणि कंपनीला विश्वचषकादरम्यान ‘ही’ गोष्ट खाण्यास घातली गेलेली बंदी (mahasports.in)