ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत जिंकण्यात आणि पराभूत होणाऱ्या खेळाडूंमध्ये अगदी थोड्या अंतराचा फरक असतो. या स्पर्धेत जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सहभाग घेत असतात. यामुळे या स्पर्धेचा रोमांच आणखी उंचांवलेला असतो. यादरम्यान मैदानात अनेकदा धक्कादायक प्रकार देखील घडत असतात. अनेकदा असेही होत असते की, एखादा खेळाडू पराभूत झाल्यानंतर तो आपला संताप व्यक्त करत असतो किंवा विजय मिळवल्यानंतर तो जल्लोष साजरा करण्याचा नादात तो आपले भान विसरून जातो. असाच काहीसा प्रकार सोमवारी झालेल्या सामन्यात घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर, झाले असे की सोमवारी (२६ जुलै) अमेरिकन जलतरणपटू केटी लेडेकीला ४०० मीटर फ्रीस्टाईल सामन्यात जलतरणपटू एरियन टिटमसने पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले होते. हे पाहून टिटमसचे प्रशिक्षक डीन बॉक्सल हे खूप उत्साहित झाले होते. त्यावेळी त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
मोठे केस असलेले डीन बॉक्सल यांनी हवेत लाथ मारली. त्यानंतर जल्लोष साजरा करत असताना त्यांनी आपला मास्क काढून जमिनीवर आदळला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु, त्यानंतर कोरोना व्हायरसच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांनी माफी देखील मागितली आहे.(After players victory coach created ruckus watch video)
Titmus’ coach Dean Boxall looked like every living room across the country. What a moment. pic.twitter.com/j7z9a3nRuQ
— Tyson Whelan (@tyson_whelan) July 26, 2021
हा जल्लोष साजरा करून झाल्यानंतर त्यांनी म्हटले की, “मला खरंच माफी मागण्याची गरज आहे. कारण मी माझा मास्क फाडून फेकला.”
त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सेव्हन नेटवर्क सोबत बोलताना म्हटले की, “मी गेली सहा वर्ष एरियन टिटमस सोबत काम करतो आहे आणि मी अमेरिकन दिग्गज लेडेकिला पराभूत करण्यासाठी जी योजना आखली होती. ती मी माझ्यासमोर अंमलात येताना पाहिली. त्यामुळे माझा शरीरावरचा ताबा सुटला होता.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना! भूतानची कर्मा दीपिका कुमारीकडून पराभूत; थोड्याच वेळात होणार पुढील सामना