बीसीसीआयने शनिवारी (१९ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला या संघात संधी मिळाली नाही. यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले. संघात संधी न मिळाल्यावर साहाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांच्यावर निशाणा साधला होता. आता द्रविडने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर वृद्धिमान साहाने द्रविडविषयी मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्याने असा खुलासा केला की, द्रविडने त्याला निवृत्ती घेण्याचा विचार करण्याविषयी सल्ला दिला होता. कारण त्याच्या नावावर निवड समिती यापुढे विचार करणार नाही. अशात आता वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यावर राहुल द्रविड देखील या मुद्यावर व्यक्त झाले आहेत.
ते म्हणाले की, ‘मला यामुळे जराही ठेच पोहोचली नाही. साहाच्या यशाबद्दल आणि त्याच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी माझ्या मनात खूप सन्मान आहे. खूप सन्मान असल्यामुळे त्याच्याशी माझी चर्चा त्याच पातळीवर झाली. मला वाटते की, तो ईमानदारी आणि स्पष्टतेसाठी पात्र आहे. मला नव्हते वाटत की, त्याला या गोष्टी मीडियातून समजाव्यात.’
द्रविड पुढे बोलताना म्हणाले की, ‘मी खेळाडूंसोबत चर्चा करत राहणार आहे. मी जराही दुःखी नाही, कारण मला अशी अपेक्षा नाहीय की, त्याने माझ्या प्रत्येक सल्ल्याचा सन्नान करावा किंवा त्याच्याशी सहमत असावे. परंतु, याचा अर्थ असा नाही, की तुम्ही अशी चर्चा करायच्याच नाही. आत्ताही जेव्हा आम्ही प्लेइंग इलेव्हची निवड करतो, तेव्हा त्या खेळाडूंसोबत चर्चा करतो, ज्यांना निवडले गेले नाही. खेळाडू उदास होणे सहाजिकच आहे. मला वाटते की, माझ्या संघात प्रत्येक गोष्ट स्पष्ट असायला हवी.’
द्रविडच्या मते यावर्षी खूप कमी कसोटी सामने खेळले जाणार आहेत आणि रिषभ पंतने संघात स्वतःचे स्थान बनवले आहे. तसेच संघ अजून एका युवा यष्टीरक्षक फलंदाजाला तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. द्रविड म्हणाले की, ‘मला आशा आहे की, एका पातळीवर तो या गोष्टीचा आदर करेल की, मी पुढे याऊन त्याच्याशी याविषयी चर्चा करू शकलो होतो.’
महत्वाच्या बातम्या –
वृद्धीमान सहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही, बीसीसीआय करू शकते कारवाई
भारताविरुद्धच्या पराभवाचे पोलार्डने सांगितले कारण, म्हणाला, ‘आम्ही भारताच्या डावाच्या…’