भारत आणि श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यात मोहालीमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने मोठी धावसंख्या केली. अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पहिल्या डावात १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १७५ धावा ठोकल्या. शुक्रवारी (४ मार्च) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याचे अकस्मित निधन झाले. जडेजाने ही मोठी खेळी करून त्याचा मार्गदर्शक वॉर्नला एकप्रकारे श्रद्धांजलीच दिली आहे.
रवींद्र जडेजा आयपीएलचा पहिला हंगाम म्हणजेच २००८ साली राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळत होता. त्यावेळी जडेजा १९ वर्षाखालील विश्वचषक विजेता खेळाडू बनला होता. अशात त्याला दिग्गज शेन वॉर्नसोबत राजस्थान संघात खेळण्याची संधी मिळाली होती. या हंगामात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते आणि जडेजाने एका चांगल्या फिनिशरची भूमिका पार पाडलेली. त्यानंतर जडेजा वॉर्नचा आवडता खेळाडू बनला होता. वॉर्नने त्याला ‘द रॉकस्टार’ असे नाव दिले होते.
शनिवारी (५ मार्च) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने वॉर्नसोबत घालवलेल्या दिवासांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तो म्हणाला, “ही थक्क करणारी बातमी आहे. मला खूप दुःख झाले. ही बातमी मला खरी वाटत नव्हती. मी जेव्हा २००८ मध्ये त्याला भेटलो होतो. मला विश्वास बसत नव्हता की, आम्ही शेन वॉर्नसारख्या दिग्गजासोबत खेळणार आहोत. वॉर्नसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे आमच्यासारख्या युवा खेळाडूंसाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यानी मला खूप मोठा मंच दिला आणि १९ वर्षाखालील विश्वचषकानंतर थेट आयपीएमध्ये संधी मिळाली होती.”
दरम्यान, शुक्रवारी (४ मार्च) अचानक बातमी समोर आली की, शेन वॉर्न यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार शेन वॉर्नने थायलंडमधील स्वतःच्या मालकिच्या विलामध्ये अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे सांगितले गेले. वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी १४५ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये ७०८ विकेट्स नावावर केल्या. मुथय्या मुरलीधरननंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy: अजिंक्य रहाणे गोल्डन डक, तर ‘या’ खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात कमाल प्रदर्शन
गतविजेत्या मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात, हैदराबादच्या विजयाने केरला ब्लास्टर्स उपांत्य फेरीत
विश्वचषकातील पहिल्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधाराचे भारताविषयी मोठे वक्तव्य; म्हणाली…