वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकातील पहिल्या आठ पैकी एकही सामना भारताने गमावला नाहीये. परिणामी विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहेच. पण ताज्या आयसीसी क्रमवारीत देखील भारतीय खेळाडूंनी मोठी मजल मारली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट संगाचे संचालक मिकी आर्थर यांनी मोठे विधान केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंना लाभ झाल्याचे दिसते. युवा सलामीवीर शुबमन गिल वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आझम (Babar Azam) मागच्या मोठ्या काळापासून या यादीत पहिल्या स्थानी होता, पण गिलने अखेर बुधवारी त्याची बादशाहत संपवली. तसेच विराट कोहली (Virat Kohli) याने याच यातील चौथा क्रमांक गाठला आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे वनडे गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज याने शाहीन शाह आफ्रिदी याला पझाडत पहिला क्रमांक पटकावला आहे. क्रमवारीत झालेला हा फेरबदल पाकिस्तानचे संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) खूपच निराश दिसत आहेत.
मिकी आर्थर यांनी आपल्या विधानातून एकप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. आर्थर यांच्या मते खेळाडूंची ही ताजी क्रमावारी आयसीसी नाही तर बीसीसीआय तयार करत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “ही आयसीसीची नाही, तर बीसीसीआयची क्रमवारी वाटत आहे.” दरम्यान, विश्वचषक सुरू झाल्यानंतर ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा आर्थर यांनी अशा प्रकारेचे वादग्रस्त विधान केले आहे.
याआधी त्यांनी भारतात होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सुमार प्रदर्शनाचे कारण, सुरक्षा असे दिले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाला 7 विकेट्सने पराभव मिळाला होता. आर्थर यांनी या पराभवामागे मैदानात पाकिस्तान संघाचे गाणे लागले नाही, असे कारण दिले होते. त्यांच्या या विधानानंतर जगभरातील पाकिस्तान संघाविषयी वेगवेगळी मते समोर आली होती. (After Shubman Gill reached No. 1 in the ODI rankings, Mickey Arthur’s big statement came out)
महत्वाच्या बातम्या –
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप
पहिल्या 5 ओव्हरमध्येच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के! बोल्टने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 बळी