इशान किशन भारतीय संघासाठी वनेड क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा चौथा भारतीय ठरला. शनिवारी (10 डिसेंबर) भारताविरुद्धच्या तिसऱ्याय वनडे सामन्यात बांगलादेश संघ 227 धावांनी पराभूत झाला. भारताच्या विजयात इशान किशन आणि विराट कोहली यांचे योगदान सर्वात मोठे राहिले. सामना जिंकल्यानंतर इशानने माध्यमांशी बोलताना खास प्रतिक्रिया दिली. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचे इशानच्या द्विशतकीय खेळीत योगदान राहिले, असेही त्याने यावेळी सांगितले.
सामना सिंपल्यानतर इशान किशन () सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले असून एकूण 131 चेंडूत 210 धावा केल्या. एवढी मोठी खेळी असली, तरी इशान मात्र यावर समाधानी नाही. त्याने 300 धावा करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याचे बोलून दाखवले. विजयानंतर माध्यमांशी बोलताना इशान किशन म्हणाला, “जेव्हा मी बाद झालो, तेव्हा 15 षटके शिल्लक होते. माझ्याकडे 300 धावा करण्याची संधी होती.”
वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी यापूर्वी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विसतके केली आहेत. आता या यादीत इशानचे नाव जोडले गेले असून याविषयी देखील त्याने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “अशा दिग्गजांसोबत माझे नाव ऐकून मी खुश आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली आहे. मी ठरवलं होतं चेंडू कमजोर असला की, त्यावर प्रहार करायचा.” सामन्यादरम्यान इशान षटकार मारू स्वतःचे शतक पूर्ण करणार होता. मात्र त्याच्यासोबत खेळपट्टीवर उपस्थित असलेल्या विराटने यावेळी त्याला महत्वाचा सल्ला दिला. “मी विराट भाऊसोबत फलंदाजी करत होतो, तो मला सांगत होता की, कोणत्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमकतेने खेळले पाहिजे. मी 95 धावांवर खेळत असताना षटकार मारून शतक पूर्ण करू इच्छित होतो. पण विराट म्हणाला हे माझे पहिले शतक आहे, त्यामुळे जोखीम न घेता एक दोन धावा करून शतक पूर्ण कर.”
मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात मैदानात उतरण्यापूर्वी इशानने सूर्यकुमार यादवसोबत देखील चर्चा केली होती. सूर्या या दौऱ्यात विश्रांतीवर असला, तरी त्याच्याकडून इशानला महत्वाचा सल्ला नक्कीच मिळाला. इशान किशन म्हणाला की, “मी सूर्यकुमार भाऊसोबत चर्चा केली होती. त्याने सांगितले की, सामन्याआदी जर तुम्ही फलंदाजीचा सराव केला, तर क्रीजवर उतरल्यावर चेंडू जास्त चांगल्या पद्धतीने दिसतो. मला जास्त दबान न घेता संधीचा फायदा घ्यायचा होता.”
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 409 धावा केल्या होत्या. यामध्ये 210 धावा एकट्या इशान किशनच्या, तर 113 धावा विराट कोहलीच्या होत्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघ मात्र 34 षटकामध्ये 182 धावा करून सर्वबाद झाला. (After the double century, Ishan Kishan gave a big reaction about Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्विशतक एक विक्रम अनेक! अवघ्या 24 व्या वर्षी इशान किशनचा जबरदस्त कारनामा
भले शाब्बास! सचिन- द्रविड अन् गांगुलीनंतर आता ईशान- विराट जोडीचं घेतलं जाणार नाव, कारणही तितकंच खास