रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मागच्या 15 आयपीएल हंगामांमध्ये एकदाही विजेतेपद पटकावता आले नाहीये. संघात एकापेक्षा एक दिग्गज असुनही आरसीबीला विजेतेपद पटकावता आले नाही, म्हणून सोशल मीडियावर नेहमीच संघ ट्रोल होत आला आहे. अशात आता आरसीबीच्या महिला संघांने देखील पुरुषांप्रमाणेच निराशाजनक प्रदर्शन सुरू केले, असे चाहत्यांना वाटत आहे. सोमवारी (6 मार्च) आरसीबीने डब्ल्यूपीएलमध्ये सलग दुसरा पराभव स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आरसीबीला ट्रोल करणारे मिम्स तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएल (IPL) प्रमाणेच डब्ल्यूपीएल (WPL) मध्येही आरसीबीचा संघ एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे. आरसीबी महिला संघाचे कर्णधारपद भारतीय स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सांभाळत आहे. स्मृतीसह संघात सोफी डिवाईन, एलिस पेरी, ऋचा घोष आणि रेणुका सिंग अशा काही प्रमुख खेळाडूंचा संघात समावेश आहे. असे असले तरी, आरसीबीने डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच हंगामातील आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.
आरसीबी संघाने खेळलेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना एकतर्फी पराभव मिळाला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबी संघ दिल्ली कॅपिटल्स संघाकडून 60 धावांनी पारभूत झाला. तसेच दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने 15व्या सामन्यात लक्ष्य गाठत 9 विकेट्सने आरसीबीचा पराभव केला. डब्ल्यूपीएलच्या या पहिल्या हंगामात एकूण पाच संघ खेळत असून गुणतालिकेत आरसीबी सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. संघाला या स्पर्धेत अपेक्षित सुरुवात मिळाली नसल्यामुळे नेटकरी पुरुषांच्या आरसीबी संघाची या संघाची तुलना करत आहेत.
https://www.instagram.com/p/CpdJEDlDAwO/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CpdHtAbPHD7/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CpdIdIwP8dq/?utm_source=ig_web_copy_link
IPL or WPL #RCB Bowling is Same 🚶#WPL2023 #RCBvDC pic.twitter.com/y2rr8AZPvv
— 𝗦𝗵𝗿𝗲𝘆𝗶 ᵀᵒˣᶦᶜ (@NameIsShreyash) March 5, 2023
No shame to be an RCBian 😇😎 #RCB #ESCN https://t.co/2PymekbVZ9
— Harshad 𝕏 (@_anxious_one) March 6, 2023
RCB men & RCB women pic.twitter.com/9PEJ0vbrsc
— Alexandra Hartley (@AlexHartley93) March 5, 2023
RCB fans right now :#RCBvsDC #RCB pic.twitter.com/e7F2AJjBFP
— Shimav Pedru (@OldEeschool) March 5, 2023
#RCBvsMI
The #RCB men's team has not won any IPL. We Expect our #women will win the first season of #WomensIPL.Le #RCB women team: pic.twitter.com/V7BO0O9eCF
— Abhishek (@Theroyalmishra) March 7, 2023
Me watching #RCB Women playing as bad as #Rcb Men#RCBvsDC #WPL #WomenPremierLeague #TaraNorris pic.twitter.com/vWLfKcpZrU
— Aryan vaish (@Aryanvaish87) March 5, 2023
POV: you’re RCB fan#RCB pic.twitter.com/9o3hnSctrK
— Cristiano Rohanaldo 🍉🍗 (@SiuuRohan) March 4, 2023
दरम्यान, सोमवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्याचा विचार केला, तर मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला. मुंबईने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाचा पराभव केला होता. आरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांमध्ये आरसीबीने 18.4 षटकांमध्ये 155 धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात मुंभई इंडियन्सने हे लक्ष्य 14.2 षटकात गाठले. या धावा करण्यासाठी मुंबईने फक्त एक विकेट गमावली. हेली मॅथ्यूज सामनावीर ठरली, जिने मुंबई संघासाठी 4 षटकांमध्ये 28 धावा खर्च करून 3 विकेट्स नावावर केल्या.
(After the second defeat in a row, RCB Women’s team has come under the netizens’ target)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका कैद्यासाठी रद्द झालेली मोठी टेस्ट मॅच, ज्याला म्हटलं जातं इंग्लंडच्या इतिहासातील कुप्रसिद्ध दरोडखोर
जेव्हा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा खेळलेल्या 2 टीम इंडिया, जाणून घ्या काय लागलेला निकाल