---Advertisement---

WTC फायनलमधील पराभव पचवून भारतीय क्रिकेटपटू घेतायेत सुट्ट्यांची मजा, पाहा फोटो

On: रविवार, जून 27, 2021 12:40 AM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा न्यूझीलंड संघाकडून 8 विकेटनी पराभव झाला. न्यूझीलंड संघाकडून पराभव पचवून आता भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेकडे लक्ष द्यायचे आहे. परंतु, या कसोटी मालिकेअगोदर भारतीय संघाला ३ आठवड्यांची सुट्टी देण्यात आली आहे. जेणेकरून पुन्हा बायोबबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय संघ मानसिकदृष्ट्या ताजातवाना होऊ शकेल.

भारतीय संघ सध्या लंडनमध्ये पोहोचला आहे. इथूनच भारतीय संघातील खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले आहे. रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल यांनी सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल आपल्या कुटुंबासोबत मस्ती करताना दिसून येत आहेत.

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी समायराबरोबरचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अजिंक्य रहाणेची मुलगी समायराही दिसून येत असून रोहितने रहाणेलाही टॅग केले आहे.

https://www.instagram.com/p/CQlvZbbBBk5/

तसेच मयंक अगरवालने आपली पत्नी आशिथा सोबत ब्रायटन पॅलेसच्या बाहेर काढलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर ते तेथील स्थानिक बाजारांचा आणि पदार्थांचा आस्वाद घेत असतानाही दिसून आले आहेत.

https://www.instagram.com/p/CQivdWQLWzj/

आर अश्विनची पत्नी प्रिती नारायणन हीनेही फिरायला गेल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CQl2RAUqxpc/

बीसीसीआयच्या सूत्रानुसार, काही खेळाडू टेनिस हा खेळ पसंत करतात. त्यामुळे लंडनमध्ये सध्या खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डनमध्ये कोर्टवर जाऊन सामना बघण्याची जर प्रेक्षकांना संधी मिळाली तर काही खेळाडू टेनिसचे सामने पाहायला जाऊ शकतात. तसेच काही खेळाडू युरो कप सामन्यांचे तिकीट उपलब्ध होतायेत का हे पाहत आहेत.

सर्व भारतीय खेळाडू 14 जुलैला लंडनमध्ये पुन्हा एकत्र येणार आहेत. आणि त्यानंतर नॉटिंघमसाठी रवाना होणार आहेत. नॉटिंघममध्ये इंग्लंड आणि भारतीय संघामध्ये 4 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सारा तेंडुलकर ‘या’ ९ क्रिकेटपटूंना करते इंस्टाग्रामवर फॉलो; ४ क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नींचाही समावेश

सचिनलाही एकेकाळी जाणवत होता मानसिक दबाव, जवळपास ‘इतकी’ वर्षे लागली नव्हती सामन्यापूर्वी शांत झोप

श्रीलंका दौऱ्यात शिखरसह कोण करणार सलामीला फलंदाजी? ‘या’ तीन युवा फलंदाजाचे आहेत पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---