---Advertisement---

“भारतीय चाहत्यांमध्ये खेळभावनेची कमतरता” विश्वविजेत्या खेळाडूने उपटले भारतीय क्रिकेटप्रेमींचे कान

On: रविवार, जून 27, 2021 1:03 AM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघावर या सामन्यात पराभव झाल्याने टिका करण्यात येतेय. या पराभवामुळे तयार झालेला चाहत्यांचा रोष अजूनही कमी झालेला नाही. त्याचवेळी, भारताच्या एका माजी विश्वविजेत्या क्रिकेटपटूने भारतीय चाहत्यांमध्ये खेळ भावनेची कमतरता असल्याचे म्हटले आहे.

भारतीय चाहत्यांमध्ये खेळभावनेची कमतरता
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व इतर संघावर चाहते चिडलेले दिसत आहेत. मात्र, यावर भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य कीर्ती आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आझाद यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले, “जेव्हा संघाचा पराभव होतो तेव्हा तुम्ही म्हणू शकता की संघामध्ये जिंकण्याची इच्छा नव्हती. तुम्ही खेळ देखील जिंकण्यासाठीच पाहता. मात्र, भारतीय चाहत्यांना केवळ जिंकण्याची भावना माहित आहे, खेळभावना नाही. भारतीय चाहत्यांना संयम बाळगावा लागेल आणि या काळात चांगला खंबीर पाठिंबा द्यावा लागेल. खेळाडूंची दोन वर्षांची मेहनत एका सामन्याने कमी होत नाही.”

भारतीय संघाने कपिलदेव यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या पहिल्या विश्‍वचषक विजयाला ३८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला.

क्रिकेटमधून राजकारणात उतरले आझाद
कीर्ती आझाद यांनी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी दोन वेळा दरभंगा येथून खासदारकीची निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्याने, सध्या ते सक्रीय राजकारणापासून बाजूला आहेत. त्यांचे वडील बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री देखील राहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रिकेटर नसता तर ‘हा’ भारतीय खेळाडू सॉफ्टवेअर इंजिनिअर असता

“कोहलीमध्ये दिसते रिचर्ड्स आणि पॉन्टिंगची झलक, असे खेळाडू दशकातून एकदाच भेटतात”

WTC फायनलमधील पराभव पचवून भारतीय क्रिकेटपटू घेतायेत सुट्ट्यांची मजा, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---