इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी घोषित करण्यात आलेल्या 18 सदस्यांच्या टीम इंडियामध्ये करोडो भारतीय चाहते एका खेळाडूची निवड न झाल्यामुळे सगळ्यात जास्त आश्चर्य चकित आहेत. तो खेळाडू म्हणजे सरफराज खान (Safaraz khan) . सर्फराज खानच्या नावानंतर नाव येतं, ते म्हणजे श्रेयस अय्यर (shreyas iyer). श्रेयसने मागच्या हंगामात घरेलू मैदानात शानदार कामगिरी केली होती, तरीसुद्धा त्याला संघात निवडण्यात आले नाही. तत्पूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी या प्रश्नाचे कारण सांगितले आहे.
प्रश्नाचे उत्तर येताना आगरकर म्हणाले, श्रेयसची वनडे मालिका चांगली राहिली. त्याने घरेलू क्रिकेटमध्ये सुद्धा चांगले प्रदर्शन केले, पण सध्या त्याच्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये जागा नाही. अय्यरने त्याचा शेवटचा कसोटी सामना मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यामध्ये खेळला होता. तेव्हा पाच सामन्याच्या मालिकेत त्याने दोन सामने खेळले होते. एक हैदराबाद तसेच दुसरा विशाखापटनममध्ये खेळला होता.
मागे झालेल्या घरेलू हंगामात श्रेयस अय्यर मुंबईसाठी फक्त 5 रणजी ट्रॉफी सामन्यांचा भाग राहिला. पण या सामन्यांमध्ये त्याने त्याचा फॉर्म सिद्ध केला. त्याने 7 डावात 68.57 च्या सरासरीने 2 शतकांसहित 480 धावा केल्या. या प्रदर्शनानंतर आणि वनडे संघाचा भाग झाल्यानंतर चाहत्यांना आशा होती की, आता कसोटी संघात अय्यरचे पुनरागमन होईल. पण त्याची ही दमदार खेळी गंभीर आणि निवडकर्त्यांचा विश्वास जिंकू शकली नाही.






