यावर्षी क्रिकेटमध्ये अनेक नवनवे विक्रम रचले गेले. आता वर्षाच्या शेवटीही क्रिकेटविश्वात कधीही न घडलेला विक्रम झाला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामने सुरू आहेत. या दोन्ही सामन्यांची सुरूवात बॉक्सिंग डे अर्थातच 26 डिसेंबरला झाली आहे. यामधील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAKvNZ) सामना कराचीमध्ये खेळला जात असून सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 डिसेंबरला क्रिकेटमध्ये कधीही न घडलेला विक्रम रचला गेला. त्याचे कारण पाकिस्तानचा खेळाडू ठरला आहे.
पाकिस्तानच्या आगा सलमान (Agha Salman) याने संघाच्या पहिल्या डावात न्यूझीलंडविरुद्ध 155 चेंडूत 103 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 17 चौकारांच्या सहाय्याने या धावा केल्या. त्याचे हे शतक यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200वे शतक ठरले आहे. याबरोबरच एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 शतक करण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. 2022च्या आधी 2015मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके केली गेली होती.
2015मध्ये 193 आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण केली गेली. त्याचबरोबर 2014मध्ये 191 आंतरराष्ट्रीय शतके केली होती. विशेष म्हणजे सलमानचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले आहे. तो न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये बाबर आझम याने 161 धावा आणि जवळपास 4 वर्षानंतर संघपुनरागमन करणाऱ्या सरफराज अहमदने 86 धावा केल्या. ज्यामुळे पाकिस्तानचा पहिला डाव 10 विकेट्स गमावत 438 असा राहिला. दुसरीकडे न्यूझीलंडने जबरदस्त सुरूवात केली आहे. टॉम लॅथम 84 आणि डेवॉन कॉनवे 82 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
पाकिस्तान-न्यूझीलंड संघात दोन कसोटी आणि तीन वनडे मालिका खेळल्या जाणार आहेत. न्यूझीलंडच्या आधी पाकिस्तान घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळला. ज्यामधील एकही सामना यजमानांना जिंकता आला नाही.
पाकिस्तान-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना अजूनही सुरूच असून शतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. Agha Salman hit 200th Century of 2022 International Cricket Most international hundreds in One Year
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठवडाभरातच रिक्षा चालकाच्या मुलाचे नशीब फळफळले! पहिले आयपीएल नंतर टीम इंडियात केला प्रवेश
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संजूची टीम इंडियात एंट्री, मात्र वनडे….