Shreyas Iyer :- श्रेयस अय्यर गुरुवारपासून (15 ऑगस्ट) तामिळनाडूतील चार ठिकाणी सुरू होणाऱ्या बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो या स्पर्धेत मुंबईसाठी एक सामना खेळेल. श्रेयस अय्यर 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान कोईम्बतूर येथे खेळल्या जाणाऱ्या मुंबईच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही या सामन्यात खेळणार आहे. संघाचे नेतृत्व सरफराज खान करेल.
अजिंक्य रहाणेच्या जागी सर्फराज खानची बुची बाबू निमंत्रीत क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे प्रथमच मुंबई संघाचे नेतृत्व करेल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सहसचिव दीपक पाटील यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘श्रेयस अय्यर तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. तो 27 ऑगस्टपासून कोईम्बतूर येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळेल.’
या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून अय्यरचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हैदराबाद, बंगाल, मुंबई, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, छत्तीसगड, गुजरात व तमिळनाडूमधील टीएनसीए इलेव्हन आणि टीएनसीए प्रेसिडेंट इलेव्हन हे बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत सहभागी होतील. प्रथमश्रेणी खेळवली जाणारी ही स्पर्धा तिरुनेलवेली, कोईम्बतूर, सेलम आणि नाथम येथे आयोजित केली जाईल.
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा मानली जाते. यापूर्वी देखील भारताचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळताना दिसले आहेत. सध्या भारतीय संघाचा भाग असलेल्या रजत पाटीदार, ईशान किशन, आकाश दीप, उमरान मलिक यांच्यासारखे खेळाडू यावर्षी या स्पर्धेत उतरताना दिसतील. यानंतर हे बहुतांशी खेळाडू दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
PAKvsBAN: पाकिस्तानात समोस्यांपेक्षा स्वस्त दरात मिळतायत कसोटीची तिकिटे, सोशल मीडियावर होतंय हसू!
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत
इशानकडे स्वत:हून चालून आली संधी, संघात पुनरागमन करताच गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ