---Advertisement---

IND vs SA: भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर! जाणून घ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 21, 2025 7:04 PM
IND vs RSA (1)
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे, जिथे 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे (Test series IND vs SA) . कसोटीनंतर 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका आयोजित केली जाणार आहे. वनडे आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे. अनेक स्टार खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर काहींना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

भारताविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांसाठी कर्णधारपद टेम्बा बावुमाला (Temba Bavuma) देण्यात आले आहे, तर 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत एडेन मार्करम (Aiden Markram) दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसला (Dewald Brevis) वनडे आणि टी-20 दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय ऑटनील बार्टमॅन आणि कॉर्बिन बॉश यांनाही दोन्ही मालिकांसाठी संघात संधी मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वनडे संघ:

टेम्बा बावुमा (कर्णधार), ऑटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्ज्के, डेवाल्ड ब्रेविस, नान्द्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोरजी, रूबिन हर्मन, मार्को यानसन, केशव महाराज, एडेन मार्करम, लुंगी एनगिडी, रियान रिकेल्टन, प्रेनेलन सुब्रायन.

दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ:

एडेन मार्करम (कर्णधार), ऑटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोरजी, डोनोव्हन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को यानसन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्ट्जे, ट्रिस्टन स्टबस.

वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिला वनडे: 30 नोव्हेंबर

दुसरा वनडे: 3 डिसेंबर

तिसरा वनडे: 6 डिसेंबर

टी-20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी-20: 9 डिसेंबर

दुसरा टी-20: 11 डिसेंबर

तिसरा टी-20: 14 डिसेंबर

चौथा टी-20: 17 डिसेंबर

पाचवा टी-20: 19 डिसेंबर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---