पुणे (19 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजपासून प्रमोशन फेरीच्या सामान्यांना सुरुवात झाली. प्रमोशन फेरीतील 8 संघ हे मानांकन मिळवण्यासाठी खेळणार आहेत. प्रमोशन फेरीतील गुणतालिकेच्या आधारावर प्ले-ऑफसच्या सामन्याचा चित्र स्पष्ट होणार आहे. आज प्रमोशन फेरीच्या पहिल्या दिवशी अहमदनगर, कोल्हापूर, पालघर व सांगली या संघानी विजय मिळवला..
आज झालेल्या पहिल्या सामन्यात अहमदनगर संघाने नंदुरबार संघावर विजय मिळवला. सुरुवातीला नंदुरबार संघाने चंगली लढत दिली. मात्र अहमदनगर संघाने 36-27 असा विजय मिळवत सामना एकतर्फी जिंकला. अहमदनगरच्या विजयात प्रफुल झवारे पुन्हा एकदा उत्कृष्ट ठरला. तर शिवम पठारेच्या येण्याने अहमदनगर संघ आणखी भक्कम झाला आहे. आजच्या दुसऱ्या सामन्यात मध्यंतराला 11-17 अशी पिछाडी असताना कोल्हापूर संघाने पलटवार करत सामना फिरवला. सौरभ फगारेच्या आक्रमक चढाया व दादासो पुजारीच्या हाय फाय खेळीच्या जोरवार कोल्हापूर संघाने 34-27 असा विजय मिळवला.
आज संध्याकाळ सत्रात झालेल्या तिसऱ्या सामन्यात पालघर संघाने बीड संघावर 38-24 असा विजय मिळवत प्रमोशन फेरीत जोरदार सुरुवात केली. पालघर संघाचा यश निंबाळकर विजयाचा शिल्पकार ठरला तर अभिनय सिंग व प्रेम मंडळ उत्कृष्ट पकडी केल्या. तर आजच्या शेवटच्या सामन्यात सांगली ने 53-42 असा विजय मिळवला. सांगलीच्या तीन चढाईपटूंनी सुपर टेन पूर्ण केले तर मुंबई शहरच्या एकट्या राज आचार्य ने चढाईत एकूण 30 गुण मिळवत सामन्यात चांगली रंगत आणली होती. (Ahmednagar, Kolhapur, Palghar and Sangli teams have a winning start in the promotion round)
प्रमोशन फेरी गुणतालिका.
1. पालघर – 6 गुण (1 सामना)
2. सांगली – 6 गुण (1 सामना)
3. अहमदनगर – 6 गुण (1 सामना)
4. कोल्हापूर – 5 गुण (1 सामना)
5. रत्नागिरी – 1 गुण (1 सामना)
6. नंदुरबार – 0 गुण (1 सामना)
7. मुंबई शहर – 0 गुण (1 सामना)
8. बीड – 0 गुण (1 सामना)
महत्वाच्या बातम्या –
CSK vs RCB सामन्याची तिकिटं कशी खरेदी करायची? तिकिटांची किंमत किती? जाणून घ्या सर्वकाही
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाची जोरदार सुरुवात