अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध कोल्हापूर ताडोबा टायगर्स यांच्यात आजची तिसरी लढत झाली. दोन्ही संघांनी आपले प्रमोशन फेरीतील पहिले दोन्ही सामने जिंकले होते. त्यामुळे आजचा सामना जिंकून पहिल्या स्थानावर राहण्यासाठी दोन्ही संघाच्यात चुरस बघायला मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र अहमदनगर संघाने पहिल्या पाच मिनिटांतच कोल्हापूर संघावर लोन पाडत सामन्यात आघाडी मिळवली.
अहमदनगर संघात आज आदित्य शिंदे नसल्याने कारणाने आजची संपूर्ण चढाईची धुरा प्रफुल झवारे यांच्यावर होती. प्रफुल ला बचावपटूंनी चांगली साथ देत मध्यांतरा आधी कोल्हापूर संघाला 2 वेळा ऑल आऊट होण्याची नामुष्की आली. कोल्हापूर संघाच्या तेजस पाटील च्या गैरहजेरीत ओमकार नारायण पाटील वर चढाईची जबाबदारी होती. मध्यांतरला अहमदनगर संघाकडे 23-14 अशी 9 गुणांची आघाडी होती.
मध्यांतरा नंतरही अहमदनगर संघाने आक्रमक खेळ करत आपली आघाडी भक्कम केली. 48-25 असा मोठा विजय मिळवत अहमदनगर संघाने तिसरा विजय मिळवला. अहमदनगर च्या प्रफुल झवारे ने चढाईत 10 गुण मिळवले. तर पकडीत अजित पवार ने 7, अभिषेक पवार ने 4, संभाजी वाबळे ने 4 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. कोल्हापूर कडून ओमकार पाटील ने चढाईत 8 गुण मिळवले. संपूर्ण सामन्यात कोल्हापूर संघाला तेजस पाटीलची कमतरता जाणवली. (Ahmednagar Periyar Panthers team’s winning hat-trick in the promotion round)
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- अजित पवार , अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- ओमकार नारायण पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रमोशन फेरीत नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाचा पहिला विजय, मुंबई शहरच विजयी रथ रोखला
पुणे पलानी टस्कर्स संघाचा प्रमोशन फेरीत दुसरा विजय