इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ट्रॉफी एकदा जिंकणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. आयपीएल 2023मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची कमान एडेम मार्करम याच्या हातात सोपवली गेली आहे. हैदराबाद संघाच्या कर्णधारपदासाठी एडन मार्करम, मयंक अगरवाल आणि भुवनेश्वर कुमार यांची नावे चर्चेत होती. पण इतर दोघांना मागे टाकून मार्करमने बाजी मारली. दक्षिण आफ्रिका संघाच्या या दिग्गज खेळाडूला कर्णधारपदाचा पुरेसा अनुभव असल्याने हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) फ्रँचायझी मागच्या काही वर्षांमध्ये विदेशी कर्णधारांना अधिक प्राधान्य देताना दिसली आहे. कर्णधारपदाचा स्वदेशी वर्याय उपलब्ध नसल्यामुळे फ्रँचायझीला असा निर्णय घ्यावा लागल्याचे दिसले आहे. 2016 साली ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर (David Warner) याच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने आयपीएल किताब जिंकला होता. त्यानंतर मागच्या हंगामापर्यंत न्यूझींलंडचा दिग्गज केन विलियम्सन (Kane Williamson) याने संघाचे नेतृत्व केले. आगामी हंगामात ही जबाबदारी एडेम मार्करम (Aiden Markram) याच्यावर सोपवली गेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एसए20 लीगमध्ये मार्करमनच्या नेतृत्वातील सनरायझर्स इस्टर्न कॅप (Sunrisers Eastern Cape) संघ विजयी झाला. तसेच मार्करने स्वतःच्या नेतृत्वात 19 वर्षांखालील विश्वचषक देखील जिंकला आहे. नेतृत्वाच्या बाबतीत त्याचे कामगिरी समाधानकारक राहिली असून आगामी आयपीएल हंगामात त्याच्यावर सर्वांची नजर असेल.
मार्करमची आयपीएल कारकीर्द
मार्करम सध्या 28 वर्षींचा असून दक्षिण आफ्रिकेसाठी 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर त्याला वरिष्ठ संघात संधी मिळाली. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 527 धावा केल्या आहेत. यादरम्यान सरासरी 40 पेक्षा जास्त, तर स्ट्राईक रेट 134 राहिला आहे. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल मेगा लिलावात मार्करमनला खरेदी करण्यासाठी हैदराबाद फ्रँचायझीने 2 कोटी 60 लाख रुपये खर्च केले होते. मार्करमनच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीचा विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाकडून त्याने आतापर्यंत 31 सामने खेळले आहेत. यात 38.22 ची सरासरी आणि 147.73 च्या स्ट्राईक रेटने 879 धावा केल्या. मार्करम फलंदाजीसह गोलंदाजीत देखील कमाल करू शकतो. आयीएलमध्ये त्याच्या नावार एक, तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सात विकेट्सची नोंद आहे. मार्करमनचा हा दुसरा आयपीएल संघ आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे.
THE. WAIT. IS. OVER. ⏳#OrangeArmy, say hello to our new captain Aiden Markram 🧡#AidenMarkram #SRHCaptain #IPL2023 | @AidzMarkram pic.twitter.com/3kQelkd8CP
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 23, 2023
आयपीएल 2023 साठी सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
फलंदाज – हॅरी ब्रुक, राहुल त्रिपाठी, मयंक अगरवाल, हेनरिच क्लासेन, एडेन मार्करम, ग्लेन फिलिप्स, उपेन्द्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंह.
अष्टपैलू – समर्थ व्यास, सनवीर सिंह, मयंक डागर, विवरांत शर्मा, अब्दुल समद, मार्को यानसेन, अभिषेक शर्मा, वॉशिंगटन सुंदर.
गोलंदाज – उमरान मलिक, फजहलहक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, अकील हुसैन, आदिल रशीद, मयंक मार्कंडे.
(Aiden Markram became the captain of Sunrisers Hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल ब्रेकिंग! ‘हा’ खेळाडू करणार हैद्राबाद संघाचे नेतृत्व, संघव्यवस्थापनाकडून नावावर शिक्कामोर्तब
भारताच्या माजी दिग्गजाची घसरली जीभ! बुमराहविषयी म्हणाला, ‘आयपीएल खेळला नाहीतर जग नष्ट होणार नाहीये’