इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2023 स्पर्धेसाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू एडेन मार्करम याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्यानंतर, आता मार्करमने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला एसए टी20 लीगमध्ये खेळताना पाहायला आवडेल असे म्हटले.
मागील वर्षी हैदराबादचे नेतृत्व केन विलियम्सनने केले होते. मात्र, संघाला प्ले ऑफपर्यंत मजल मारण्यात अपयश आलेले. त्यानंतर या हंगामासाठी कर्णधार कोण असणार याबाबत बराची चर्चा सुरू होती. अखेरीस, संघाचे नेतृत्व मार्करम याच्याकडे देण्यात आले.
मार्करमने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे कौतुक केले. तसेच, भविष्यात धोनीला एसए टी20 लीगमध्ये खेळताना पाहायला आवडेल असे म्हटले. तो म्हणाला,
“एमएस धोनी एक दिग्गज क्रिकेटपटू असून, त्याच्याकडे भरपूर ज्ञान आणि अनुभव आहे. मला त्याला एसए टी20 लीगमध्ये खेळताना पाहायला आवडेल. त्याच्यासह अजूनही भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळल्यास दक्षिण आफ्रिकेत युवा खेळाडूंना त्याचा फायदा होईल.”
नुकताच दक्षिण आफ्रिकेत एसए टी20 लीगचा पहिला हंगाम खेळला गेला. या पहिल्याच हंगामात मार्करम याच्या नेतृत्वातील सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने विजय मिळवला. या लीगमध्ये आयपीएल फ्रॅंचायझीच्याच मालकीचे सहा संघ दिसले होते. यामध्ये चेन्नई, मुंबई, राजस्थान, हैदराबाद, लखनऊ व दिल्लीच्या संघमालकांचा समावेश होता.
(Aiden Markram Hoping MS Dhoni Will Play In SA T20 League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’