दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India 2nd test) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सध्या रोमांचक स्थितीत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका (south africa) संघाला विजय मिळवण्यासाठी आणखी १२२ धावा करायचा आहेत तर भारतीय संघाला ८ फलंदाजांना बाद करायचं आहे. या सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant) भरपूर चर्चेत राहिला आहे. सुरुवातीला तो नको असलेला शॉट खेळून बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर त्याची एडेन मार्करम (Aiden Markram) सोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रिषभ पंत ज्यावेळी दुसऱ्या डावात फलंदाजीला आला होता, त्यावेळी भारतीय संघाला अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने मजबूत स्थितीत आणले होते. हे दोघे बाद होऊन माघारी परतल्यानंतर रिषभ पंतवर डाव पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी होती. परंतु, त्याने अपेक्षा भंग करत तिसऱ्याच चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परिणामी त्याला बाद होऊन माघारी जावे लागले होते. (Rishabh pant and Aiden markram viral video)
तसेच त्याचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडेन मार्करमला “गप्प बस” असे म्हणताना दिसून येत आहे. तर झाले असे की, जेव्हा एडेन मार्करम फलंदाजी करत होता, त्यावेळी रिषभ पंत यष्टिरक्षण करत असताना त्याला खूप त्रास देत होता. त्यामुळे जेव्हा रिषभ पंत फलंदाजीला आला, त्यावेळी एडेन मार्करमने संधीचा फायदा घेतला आणि रिषभ पंतला स्लेजिंग करायला सुरुवात केली. हे रिषभ पंतला पटले नाही. त्यावेळी रिषभ पंत “गप्प बस” असे बोलताना दिसून आला.
https://twitter.com/cric_zoom/status/1478753493275922433?s=20
रिषभ पंतने केला मोठा विक्रम
युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी मोठा कारनामा केला. याच कसोटी सामन्यात रिषभ पंतने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर लुंगी एन्गिडीचा झेल टिपताच कसोटी क्रिकेटमध्ये १०० झेल टिपण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे. यापूर्वी एमएस धोनीने २५६, सैय्यद किरमाणीने १६० आणि किरण मोरेने ११० झेल टिपण्याचा पराक्रम केला होता. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ४२ वा यष्टिरक्षक ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या :
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
हे नक्की पाहा: