गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसई यांचा मंडळाचा सुवर्ण महोस्तवी वर्ष असून कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत आज दोन उपांत्य फेरीचे सामने रंगले. एयर इंडिया विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात अंतिम सामना रंगणार.
एयर इंडिया विरुद्ध सेन्ट्रल बँक यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. एयर इंडिया संघाने सुरुवाती पासून आक्रमक पवित्रा घेत आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यत १९-०७ अशी आघाडी एयर इंडिया कडे होती.
एयर इंडिया कडून चढाईत सुशांत साहिलने आक्रमक खेळ करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर शुभम शिंदे ने चांगल्या पकडी केल्या. एयर इंडियाने २९-२१ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. सेंट्रल बँक कडून विनायक मोरे व ओमकार मोरे यांनी चांगला खेळ दाखवला पण त्याना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
दुसरा उपांत्य सामना भारत पेट्रोलियम विरुद्ध जेएसडब्लू रायगड यांच्यात झाला. सामन्याच्या ९ व्या मिनिटालाच जेएसडब्लू संघावर दुसरा लोन पडले. भारत पेट्रोलियम संघाने २०-०३ अशी आघाडी मिळवली होती. अजिंक्य कापरे ने चढाईत चांगला खेळ केला.
मध्यंतरापर्यत २६-०६ अशी भक्कम आघाडी भारत पेट्रोलियम संघाकडे होती. नितीन मोरे व निलेश शिंदे यांनी चांगला पकडी करत विजयात मोलाची भूमिका पार पाडली. एकतर्फी सामन्यात भारत पेट्रोलियम संघाने ३३-१२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
भातसई राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा
अंतिम सामना
एयर इंडिया विरुद्ध भारत पेट्रोलियम