माजी भारतीय अनुभवी खेळाडू अजय जडेजा 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मार्गदर्शक होता. अफगाणिस्तानने त्या विश्वचषकात इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या मोठ्या संघांना पराभूत केले होते. अजय जडेजाला दिलेली मोठी रक्कम अफगाणिस्तानसाठी प्रभावी ठरल्याचे मानले जात होते. मात्र, आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. ताज्या माहितीनुसार, अजय जडेजाने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून फी म्हणून एक रुपयाही घेतलेला नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओने एरिना न्यूजशी बोलताना खुलासा केला की अजय जडेजाने एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्याच्या सेवांसाठी कोणतेही पैसे घेण्यास नकार दिला. कारण तो म्हणाला, जर तुम्ही चांगले खेळलात तर मला पैसे आणि बक्षिसांन पेक्षा जास्त आहे.
अजय जडेजा 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचा मार्गदर्शक तसेच सहाय्यक प्रशिक्षक होता. अजय जडेजाच्या देखरेखीखाली अफगाणिस्तान संघाने उल्लेखनीय कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत करून खूप नाव कमावले होते. अफगाणिस्तानच्या विश्वचषकातील कामगिरीचे श्रेय जगभरातील क्रिकेट चाहते अजय जडेजाला देत होते.
अजय जडेजाने 1992 मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्याने भारतासाठी 15 कसोटी आणि 196 एकदिवसीय सामने खेळले. त्याच्या कसोटीत 576 धावा आणि वनडेत 5359 धावा आहेत. जडेजा हा त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटमधील स्पेशालिस्ट फलंदाज मानला जात होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सहा शतके आणि 30 अर्धशतके आहेत. 1996 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यात, 6 व्या क्रमांकावर असलेल्या अजय जडेजाने केवळ 25 चेंडूत 45 धावांची शानदार खेळी केली. या खेळीमुळे पाकिस्तानने तो सामना गमावला होता.
महत्तवाच्या बातम्या-
या 3 कारणांमुळे पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला
“कुर्बानी के जानवर हाजिर हो”, बाबर आझमवर भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; सोशल मीडियावर काढला राग
टी20 विश्वचषकातील टॉप 5 रोमांचक सामने, ज्यात संघानं एका धावेनं विजय मिळवला