भारतीय संघ जेव्हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जात असतो. त्यावेळी फलंदाज म्हणून ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जातो तो म्हणजे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’. रहाणेची कामगिरी ही परदेशी मैदानावर उत्तम आहे. त्याने मेलबर्न मध्ये २ शतक झळकावले आहेत. तसेच लॉर्डस, वेलिंग्टन, किंग्सटन या जगभरातील मैदानांवर देखील शतक झळकावत दाखवून दिले आहे की, तो बाऊन्स आणि स्विंग करणाऱ्या मैदानांवर उत्तम फलंदाजी करू शकतो. याविरुद्ध भारतात कसोटी क्रिकेट खेळताना त्याची सरासरी ही ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारापेक्षाही कमी आहे.
अजिंक्य रहाणे भारतात अपयशी
रहाणेने भारतात खेळलेल्या एकूण २८ कसोटी सामन्यात फक्त ३७.३५ च्या सरासरीने १४९४ धावा केल्या आहेत. तसेच रहाणेने भारतात खेळलेल्या २८ सामन्याच्या ४४ डावांपैकी ४० डावात तो २८ वेळेस फिरकी गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे. तसेच १२ वेळेस त्याला वेगवान गोलंदाजांनी बाद केले आहे. तसेच १२ वेळेस तो डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आहे. तर १६ वेळेस उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे.
भारतात रोहित, विराट आणि पुजाराची सरासरी ५० पार
कसोटी सामन्यांमध्ये भारतीय मैदानांवर विराट कोहली याची सरासरी ६७.४२, चेतेश्वर पुजारा याची सरासरी ५९.३१ तर रोहित शर्मा याने ७९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच उपकर्णधार रहाणे याने भारतात अवघ्या ३७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ३७ ची सरासरी कमी नाहीये. परंतु इतर संघसहकाऱ्यांच्या तुलनेत रहाणे याबाबतीत खूप मागे आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची गेल्या काही वर्षातील कामगिरी
नोव्हेंबर २०१६ पासून रहाणेने ४१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात ६३ डावात त्याने ३५.३५ च्या सरासरीने २२६३ धावा केल्या आहेत. यात ४ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फक्त ३ च चेंडू खेळू शकला आहे. जेम्स अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर रहाणेची दांडी उडाली आणि तो शून्य धावांवर पव्हेलियनला परतला. तत्पुर्वी पहिल्या डावातही तो एका धावेवर बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
नाम बडे और दर्शन खोटे! ‘या’ तीन खेळाडूंची आयपीएलमधून होऊ शकते सुट्टी
चेपॉकवर ‘हा’ भारतीय संपवणार शतकांचा दुष्काळ?, आणखी दोघांनाही शतक ठोकण्याची संधी
जागतिक क्रिकेटचा ‘डक स्पेशालिस्ट’ बनलाय अँडरसन, ‘इतक्या’ फलंदाजांना फोडू दिला नाही भोपळा






