---Advertisement---

अजिंक्य रहाणेसाठी ही आहे सर्वात गोड बातमी!!

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2019 12:59 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

रहाणे सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त आहे. हा सामना सुरु असतानाच रहाणेला ही गोड बातमी मिळाली आहे.

रहाणेने त्याची बालमैत्रीण राधिकाबरोबर 2014 मध्ये लग्न केले होते.

रहाणेला कन्यारत्न झाल्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने त्याला शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. हरभजनने म्हटले आहे की ‘अजिंक्य रहाणे तूला बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा. आशा आहे, आई आणि मुलगी सुखरुप असतील. अज्जू आता आयुष्यातील मजेदार भाग सुरु होत आहे.’

रहाणेने सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 15 धावा केल्या होत्या. तसेच त्याने मयंक अगरवालबरोबर चौथ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारीही रचली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment