---Advertisement---

गुरु तो गुरुच!! रहाणेच्या प्रशिक्षकांमुळे पृथ्वी शॉला गवसला फॉर्म, अवघ्या ५ दिवसांत केल्या सुधारणा

On: शुक्रवार, मार्च 12, 2021 4:37 PM
---Advertisement---

युवा भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर विजय हजारे स्पर्धेतील मुंबई संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. परंतु याच शॉला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी आपल्या खराब फलंदाजीमुळे टीकाकारांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चूही देण्यात आला होता. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यामुळे शॉ पुन्हा फॉर्ममध्ये आला.

आमरेंनी शॉला दाखवला आरसा

शॉविषयी बोलताना आमरे म्हणाले की, “शॉला फॉर्ममध्ये आणण्यासाठी, त्याला त्याच्या चुका दाखवून देण्याची गरज होती. मी मागील काही सामन्यातील त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ तयार केले आणि त्याला दाखवले की तो नक्की कुठे चुकत आहे. आमच्याकडे त्याच्या चुका दुरुस्त करण्यासाठी फक्त ५ दिवसांचा कालावधी होता. अशात एका प्रशिक्षकाच्या नाते मी त्याला मर्यादित षटकांच्या स्वरुपावर अधिक लक्ष द्यायला सांगितले. कारण आता कसोटीत त्याला संधी मिळण्याच्या अपेक्षा फार कमी आहेत.”

आमरेंची ५ दिवसांची मेहनत फळाला आली

“मी शॉला म्हणालो की, तू सध्या विजय हजारे ट्रॉफीला तुझे लक्ष्य बनव आणि त्यानुसार तुझ्या प्रदर्शनात बदल कर. याच उद्देशाने मी त्याच्याकडून तयारी करून घेतली. आम्ही प्रत्येक दिवसाचे २ भाग केले. पहिल्या भागात शॉच्या फिटनेसवर काम केले जायचे आणि दुसऱ्या भागात त्याच्या फलंदाजीवर. पुढील ५ दिवस असेच परिश्रम चालू ठेवले आणि शॉला त्याचा फॉर्म गवसला. आता तो त्याचे नैसर्गिक शॉट मारत आहे,” असे शेवटी आमरेंनी सांगितले.

महत्त्वाची बाब अशी की, आमरे हे मुंबई रणजी संघाचे माजी प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू तयार झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केवळ २६ धावा अन् रोहित ठरणार ‘हा’ विक्रम करणारा विराटनंतरचा दुसराच भारतीय

‘बडे मिया-छोटे मिया’ गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग, मोठमोठे अभिनेतेही पडतील फिके

थाला इज बॅक! नेटमध्ये धोनी करतोय गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---