---Advertisement---

अभिमानास्पद क्षण! रहाणेचे नाव दुसऱ्यांदा मेलबर्नच्या ऑनर्स बोर्डवर, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, डिसेंबर 30, 2020 3:22 PM
---Advertisement---

क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटते की आपले नाव परदेशातील ऐतिहासिक मैदानांवरील ऑनर्स बोर्डवर असावे. पण असे भाग्य प्रत्येकाचे नसते. मात्र, हे स्वप्न भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने अनेकदा पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे त्याने नुकतेच मेलबर्नच्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकट ग्राऊंडच्या ऑनर्स बोर्डवर चक्क दुसऱ्यांदा नाव कोरले आहे.

भारताने मंगळवारी (२९ डिसेंबर) बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. भारताच्या या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठे योगदान दिले. त्याने या सामन्यात २२३ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. यात त्याच्या १२ चौकारांचा समावेश आहे. हे रहाणेचे कसोटी कारकिर्दीतील १२ वे कसोटी शतक आहे.

त्याच्या या शतकानंतर त्याचे नाव मेलबर्नच्या मैदानातील ऑनर्स बोर्डवर कोरण्यात आले. या अभिमानास्पद क्षणाचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

विशेष म्हणजे या ऑनर्स बोर्डवर याआधीही रहाणेने आपले नाव कोरले होते. त्याने सन २०१४ ला मेलबर्न येथे १४७ धावांची खेळी साकारली होती, त्यावेळी त्याचे नाव या मानाच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. विशेष म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २ शतके करणारा तो भारताचा दुसराच खेळाडू आहे. याआधी विनू मंकड यांनी अशी कामगिरी केली होती.

या भारतीय क्रिकेटपटूंचेही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या ऑनर्स बोर्डवर नाव – 

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कसोटीत शतक करणाऱ्या रहाणे आणि मंकड यांच्यासह सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, गुंडप्पा विश्वनाथ आणि सुनील गावसकर यांचेही नाव ऑनर्स बोर्डवर आहे. तसेच गोलंदाजांमध्ये भागवत चंद्रशेखर, कपिल देव, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह आणि इरापल्ली प्रसन्ना यांचेही नाव या ऑनर्स बोर्डवर आहे.

या खेळाडूंचे नाव कोरले जाते ऑनर्स बोर्डवर –

फलंदाज असेल तर शतक आणि गोलंदाज असेल तर एका डावात पाच बळी किंवा सामन्यात दहा बळी अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे नाव ऑनर्स बोर्डवर कोरले जाते.

महत्त्वाच्या बातम्या –

मेलबर्न कसोटी जरी जिंकली तरी टीम इंडियाच्या ‘या’ तीन खेळाडूंना करावी लागेल सुधारणा

…म्हणून रविंद्र जडेजाला दिले जाते भारतीय संघात स्थान, रवि शास्त्री यांनी केला खुलासा

सिडनी कसोटीत रोहित शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? रवि शास्त्रींनी दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---