भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 8 विकेटने विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ ज्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला ते बघून सर्वच भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दाखल होणार आहे. भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेल्या कर्णधार अजिंक्यने पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, रोहितच्या आगमनाने संघाला नवी ताकद मिळणार आहे.
सामनावीराचा पुरस्कार घेताना अजिंक्य म्हणाला, ‘आम्ही रोहितच्या पुनरागमनाने फार उत्साहीत आहोत. मी कालच त्याच्याशी बोललो, तो देखील संघासोबत जोडण्यास फार उत्सुक आहे ‘.
रोहित येत्या 30 तारखेला दरम्यान मेलबर्न येथे भारतीय संघासोबत जोडला जाणारा आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 डिसेंबर पासून सुरू होणार असून, अद्यापही सामन्याच्या ठिकाणाबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. खरंतर सिडनी येथे सामन्याचे आयोजन होणार होते, मात्र मागील काही दिवसात तेथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत सिडनीमध्ये कसोटी सामना आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह आहे. सिडनी येथे कसोटी सामना झाला नाही, तर तो मेलबर्न येथे खेळला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“नशीब आम्ही २१ खेळाडू घेऊन आलो, नाहीतर कोचलाच बॅट घेऊन मैदानावर उतरावं लागलं असतं”
कर्णधार असावा तर असा ! अजिंक्यच्या ‘त्या’ निर्णयाने जिंकली सर्वांची मने