क्रिकेट हा जेंटलमन्स गेम म्हणजेच सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात अनेक खेळाडूंनी आपल्या खेळासह मैदानावरील आपल्या मने जिंकणाऱ्या कृतींनी क्रिकेट चाहत्यांचा मनात आपली एक विशेष जागा मिळवली आहे. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज राहुल द्रविड आज देखील क्रिकेटमधील सर्वात सभ्य खेळाडू म्हणून ओळखला जातो.
वर्तमान भारतीय संघात देखील असाच एक खेळाडू आहे जो खिलाडूवृत्तीच्या बाबतीत द्रविडचा वारसदार आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. हा खेळाडू म्हणजे भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे होय. रहाणेने २०१८ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना केलेल्या एका कृतीने सर्व भारतीयांची मान उंचावली होती. अफगाणिस्तान विरुद्ध रहाणेने आपल्या दिलदार स्वभावाचे दर्शन दिलेल्या घटनेला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
रहाणेची खिलाडूवृत्ती
सन २०१८ मध्ये अफगानिस्तान संघाला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा पहिला सामना भारता विरुद्ध बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणाने या सामन्यात खेळणार नसल्याने संघाचे नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे देण्यात आले होते. भारतीय संघाने या सामन्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवत केवळ दोन दिवसात सामना आपल्या नावे केला.
#OTD in 2018, Rahane won our hearts with a gesture for the ages towards the Afghanistan cricket team. 🤩pic.twitter.com/FNlBhfgrAX
— Wisden India (@WisdenIndia) June 15, 2021
सामना जिंकल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात रहाणेने विजेत्या संघाचा चषक स्वीकारल्यानंतर तो आपल्या संघसहकाऱ्यांनी कडे सुपूर्द केला. मात्र, त्यानंतर केलेली कृती गौरवास्पद ठरली. अत्यंत खडतर परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख मिळवलेल्या अफगाणिस्तान संघाचे कौतुक करत त्याने कर्णधार असगर अफगाण व सर्व अफगान संघाला विजयी चषकासोबत छायाचित्र काढण्यासाठी आमंत्रित केले. रहाणेच्या या कृतीने अफगाणिस्तानची खेळाडू व चाहते यांचा ऊर भरून आला. या गोष्टीसाठी रहाणेचे सर्व क्रीडा जगताने कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन म्हणतोय, कसोटी चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड; पण का? घ्या जाणून
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप
विंडिजविरुद्ध बरसले होते ऑस्ट्रेलियाचे जाबाज, एकाच डावात ५ शतकांसह चोपल्या होत्या ७५८ धावा