भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने बुधवारी (६ मे) ऑनलाईन पत्रकार परिषदेदरम्यान कोरोना व्हायरसनंतर होणाऱ्या क्रिकेटमधील बदलांबद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, कोरोना व्हायरसनंतर क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यावर खेळाडू विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी एकमेकांशी हात मिळविण्याऐवजी एकमेकांना नमस्ते म्हणतील.
रहाणे (Ajinkya Rahane) पुढे म्हणाला की, आता विकेट घेतल्यानंतर आम्हाला जुन्या पद्धतीने आनंद साजरा करावा लागेल. कदाचित आम्ही आपापल्या जागेवर उभे राहून टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करू.
क्रिकेटमधील खेळाडूंच्या पुनरागमनाबद्दल बोलताना रहाणे म्हणाला की, “कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर क्रिकेट पुन्हा सुुरु होईल, तेव्हा खेळाडूंना स्वत:ला तयार करण्यामध्ये कमीत कमी १ महिन्याचा कालावधी लागू शकतो. यानंतरच खेळाडू देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतील. असे असले तरी हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा कोरोना व्हायरसची लस तयार होईल.”
“मी सध्या घरात फीटनेसवर लक्ष देत आहे. यासाठी योगा आणि कराटेचाही आधार घेत आहे. मला प्रशिक्षकाने एक कार्यक्रम आखून दिला आहे. मी त्यानुसार प्रशिक्षण घेत आहे. मला माझ्या फलंदाजीची कमतरता जाणवत आहे. परंतु क्रिकेट तेव्हाच सुरु होईल, जेव्हा परिस्थिती आटोक्यात येईल,” असे आपल्या फीटनेसबद्दल (Fitness) बोलताना रहाणे म्हणाला.
चेंडूवर थुंकी किंवा घामाच्या वापरावरील बंदीबद्दल विचारले असता रहाणे म्हणाला की, “मला माहित नाही की, आयसीसी (ICC) आणि इतर क्रिकेट बोर्ड कोणता निर्णय घेतील. वैयक्तिकरित्या माझं मत विचाराल तर, मी कोविड-१९ हा साथीचा आजार नष्ट होण्याची वाट पाहील. तसंही जर काही बदल झाला तर क्रिकेट सुरु होण्यापूर्वी सर्वांना माहित होईलच.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-विराट आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात युवा कर्णधार, नावावर आहे धोनीपेक्षा खास विक्रम
-एबी, फिंच या परदेशी खेळाडूंशिवाय बेंगलोरची टीम अशी होईल राॅयल
-रवी शास्त्री अडकले अलिबागमध्ये, आता घेणार बीअरचा आनंद