बुधवार रोजी (०८ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या १८ सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. २६ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे विराट कोहली याच्याच हाती राहणार आहे. मात्र उपकर्णधारबाबत निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे.
भारताच्या कसोटी संघाच्या नियमित उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचा या पदावरून पायउतार करण्यात आला आहे. तरीही खराब फॉर्मशी झगडत असलेल्या रहाणेला खेळाडूच्या रुपात कसोटी संघात जागा देण्यात आली आहे. रहाणेच्या जागी आता सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे. तसे तर विराट- रोहितची ही कर्णधार-उपकर्णधाराची जोडगोळी वनडे आणि टी२० संघांमध्ये पाहायवास मिळते. परंतु आता कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ही जोडी कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून पाहिल.
परदेशातील मैदानांवर रहाणेचा राहिलाय बोलबाला
जरी रहाणेचे यावर्षातील प्रदर्शन अतिशय निराजाजनक राहिले असले, तरीही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर गेल्या तीन वर्षात मिळालेल्या १० विजयांमध्ये रहाणेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्याने या १० कसोटी सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने ८३२ धावा केल्या असून त्याची सरासरी ४६.२२ इतकी राहिली आहे. यापैकी २ कसोटी सामन्यांमध्ये तो सामनावीरही राहिला आहे. रहाणेची ही कामगिरी पाहूनच निवड समिती आणि कर्णधार विराटने त्याला संघात ठेवले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Standby Players: Navdeep Saini, Saurabh Kumar, Deepak Chahar, Arzan Nagwaswalla.#SAvIND
— BCCI (@BCCI) December 8, 2021
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ– विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग.! टी-२० नंतर रोहित शर्माच्या गळ्यात भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ
ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती