भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुढील वर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्स त्याचे ट्रेडिंग दिल्ली संघाशी करणार असल्याची चर्चा आहे.
आयपीएल 2020 चा ‘ट्रेडिंग विंडो’ गुरुवारी बंद होईल आणि त्याआधी रहाणेचे ट्रेडिंग होण्याची शक्यता आहे.
रहाणेची लिलाव रक्कम चार कोटी आहे. तसेच हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्सला रहाणेच्या बदल्यात दिल्लीकडून त्यांचे 2 खेळाडू मिळण्याची शक्यता आहे.
दिल्ली त्यांची फलंदाजी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने रहाणेला संघात समाविष्ट करु शकतात. दिल्लीकडे आधीच श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन असे फलंदाज आहेत.
रहाणे 2011 पासून राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असून त्याने या संघाचे नेतृत्वही केले आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 140 सामने खेळले असून 122 च्या स्टाइक रेटने 3820 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 27 अर्धशतके केली आहेत.
रहाणेपूर्वी प्लेअर्स ट्रेडिंगमध्ये अनेक संघांनी आपले खेळाडूंचे दुसऱ्या संघाबरोबर ट्रेडिंग केले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने आर अश्विनचे दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर ट्रेडिंग केले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने ट्रेंट बोल्टचे मुंबई इंडियन्सबरोबर ट्रेडिंग केले आहे.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला येणार धार, संघात सामील झालाय हा दिग्गज गोलंदाज https://t.co/leujNMlT3w#म #मराठी #IPL2020 #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
— Maha Sports (@Maha_Sports) November 14, 2019
२४३ भारतीय गोलंदाजांपैकी असा भीम पराक्रम करणारा आर अश्विन केवळ तिसराच!
वाचा????https://t.co/lHWpttKpom????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #RAshwin— Maha Sports (@Maha_Sports) November 14, 2019






