भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 असा विजय मिळवला.
वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडू मैदानात घाम गाळत आहेत.
काही दिवसांआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. कसोटी क्रिकेटचा सराव करायला आवडते, असेही तो यावेळी म्हणाला होता.
आता भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सरावाचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो फलंदाजी करताना दिसत आहे. पहिला चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळल्यावर रहाणेने दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने जोरदार फटका मारला.
Practice 🔁 pic.twitter.com/sOWjyAYjGH
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) December 3, 2020
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करेल.
कसोटी मालिकेत अधिक जवाबदारी असल्यामुळे रहाणे कशी कामगिरी करेल ते पाहावं लागेल.
अजिंक्य रहाणेने 65 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 42.88 च्या सरासरीने एकूण 4203 धावा केल्या आहेत. यात 11 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे आणि 188 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने
भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव