क्रिकेटविश्वात असे अनेक दिग्गज कर्णधार आणि खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. या खेळाडूंची अनेकांशी तुलना केली जात असते. सध्या भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. यादरम्यान विराट कोहली आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांची तुलना केली जात असताना, भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकरने आपले मत मांडले आहे.
आगरकरची सौरव-विराट तुलनेवर प्रतिक्रिया
भारताचा माजी अष्टपैलू व सध्या समालोचक म्हणून काम करत असणाऱ्या अजित आगरकर याने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये त्याला विद्यमान कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या तुलनेबाबत विचारण्यात आले.
त्यावर उत्तर देताना आगरकर म्हणाला, “सौरवची आपली वेगळीच शैली होती. तर धोनी देखील आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध होता. खेळात जी गोष्ट आपल्यासाठी लाभदायक असते ती करायलाच हवी. एक खेळाडू म्हणून किंवा कर्णधार म्हणून तुम्ही आक्रमक असाल किंवा ठाम असाल तरीदेखील संघाचा फायदा लक्षात घेऊन तुम्हाला काही गोष्टी करायला हव्यात. सौरव गांगुली असाच करायचा आणि आता विराटदेखील तसेच करत आहे.”
सौरव गांगुली व विराट कोहली दोघेही मैदानावरील आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात.
आगरकर पुढे म्हणाला, “दोन्ही कर्णधारांमध्ये तुलना का केली जाते हे मला माहीत नाही. दोघेही वेगवेगळ्या काळातील कर्णधार आहेत. दोघेही चांगले कर्णधार आहेत, दोघांनीही संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच दोघेही चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे तुलना करण्यात काहीही अर्थ नाही.”
सध्या आगरकर भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान समालोचक म्हणून प्रसारण वाहिनीसोबत काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित सुपरहिट! अर्धशतकासह ‘या’ विक्रमाला घातली गवसणी; केली पंतची बरोबरी
“रोहितला पूल शॉट खेळण्यापासून रोखणार नाही, मात्र…” फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
पुण्यात नीरज चोप्राच्या नावाने स्टेडियमचे उद्घाटन, ‘गोल्डन बॉय’ने ‘या’ शब्दात मानले आभार






