१९ वर्षाखालील विश्वचषकामुळे (Under 19 world cup 2022) अनेक युवा खेळाडूंना त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. या स्पर्धेने जगाला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावही शानदार कामगीरी केली आहे. आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने( akash chopra) आत्तापर्यंत खेळलेल्या १२ अंडर १९ विश्वचषकांमधील अशा खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन बनवली आहे, ज्यांनी अंडर १९ विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमठवला आहे. त्याने भारताच्या एका तर पाकिस्तानच्या २ खेळाडूंना या संघात संधी दिली आहे. या लेखात आपण आकाश चोप्राने निवडलेल्या ११ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
आकाश चोप्रा यांचा ऑल टाईम U19 संघ
बाबर आझम (पाकिस्तान), विराट कोहली (भारत), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), केन विल्यमसन (न्युझीलंड), दिनेश चंडिमल(श्रीलंका), ओएन माॅर्गन (इंग्लंड), शिमराॅन हेटमायर(वेस्टइंडीज), ख्रिस वोक्स (इंग्लंड), मेहदी हसन मिराज (बांग्लादेश), शाहीन शाह (पाकिस्तान), कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका).
आकाश चोप्रांनी बाबर आझमला या संघात स्थान देत सांगितले की, “जेव्हा मी बाबर आझमला १९ वर्षाखालील स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना पाहिले, तेव्हाच मला विश्वास बसला होता की त्याच्यात खूप क्षमता आहे.” तसेच, आकाश चोप्रांनी विराट कोहलीला आपल्या संघात घेत सांगितले की, “मी विराट कोहलीला रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या तरुण वयामध्ये पाहिले होते. मी कोहलीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी चांगली कामगिरी करेल असे वाटले नव्हते.”
या खेळाडूंशिवाय अनेक क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांनी अंडर १९ विश्वचषकात शानदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडली. भारतात शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मोहम्मद कैफ, शुभमन गिल, पृथ्वी शॉ और इशान किशन हे सर्व खेळाडू १९ वर्षाखालील विश्वचषकातुनच पुढे आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
शनिवारी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये वेस्ट इंडिजमधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स या स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. या वर्षीच्या विश्वचषकात सुद्धा भारताच्या युवा खेळाडूंनी छाप सोडली आहे. भरतीय संघाचा कर्णधार यश धुल आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार कासिम अकरम या खेळाडूंनी २०२२च्या १९ वर्षाखालील विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये पाकिस्तानचा हसिबुल्ला आणि इंग्लंडचा टाॅम पर्स्ट यांनी वर्चस्व गाजवले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू डेवाल्ड ब्रेविस आणि गोलंदाज श्रीलंका के ड्युनिथ वेलालगे आणि पाकिस्तानचा आवेश अली यांनी सुद्धा आघाडी घेतली आहे.