---Advertisement---

श्रेयससाठी ‘या’ संघाने राखून ठेवलेत तब्बल २० कोटी

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 4:12 PM
iyer-dc
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला(ipl 2022)  येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. एकूण ५९० खेळाडूंचे नशीब हे संघांवर अवलंबून असणार आहे. १० संघांनी ३३ खेळाडूंना रिटेन केले आहे. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूने अशा एका खेळाडूचे नाव सांगितले आहे, ज्यावर आगामी मेगा ऑक्शनमध्ये २० कोटी रुपयांची बोली लागू शकते.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोपडा (Aakash chopra) याने आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना, सर्वात महागडा खेळाडू कोण असेल, याबाबत भाष्य केले आहे. त्याच्या मते श्रेयस अय्यर (Shreyas iyer)  हा सर्वात महागडा खेळाडू असेल. त्याच्यामते, ईशान किशन हा मार्की खेळाडूंच्या यादीत नाहीये, नाहीतर तो सर्वात महागडा खेळाडू असता. त्यामुळे आता श्रेयस अय्यरवर पैशांचा पडेल. तर ईशान किशनला रिझर्व्ह खेळाडू म्हणून ठेवले जाईल. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स नाहीतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर  (royal challengers Bangalore) संघाचे नेतृत्व करू शकतो.

श्रेयस अय्यर हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरेल असे संकेत दिले आहेत. त्याने या गोष्टीचा देखील खुलासा केला आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ श्रेयस अय्यरला २० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान देऊ शकते. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “मला कोणीतरी म्हटले होते की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने श्रेयस अय्यरसाठी २० कोटी रुपये बाजूला काढून ठेवले आहेत.”

श्रेयस अय्यरने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ८७ सामन्यात ३१.६६ च्या सरासरीने २३७५ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल २०२० स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. परंतु अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मार्की खेळाडूंची यादी

मार्की खेळाडूंच्या यादीत १० खेळाडूंचा समावेश आहे. ज्यामध्ये सहा परदेशी आणि चार भारतीय खेळाडू आहेत. रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, क्विंटन डी कॉक, शिखर धवन, फाफ डू प्लेसिस, श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा, मोहम्मद शमी आणि डेविड वॉर्नर यांना मार्की सेटमध्ये स्थान मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

अर्रर्रर्र… अतिउत्साह नडला! हातातली मॅच एका चुकीने गमावली, पाहा शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं

सचिनला गोलंदाजी करताना घाबरायचा ऑस्ट्रेलियन ‘स्पीडस्टार’; स्वतः केला खुलासा

कॅप्टन जोमात! उपांत्य सामन्यापूर्वी यश धूलने दाबली ऑस्ट्रेलियाची दुखरी नस; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---