भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जात आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये खेळल्या जात असलेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला फलंदाजीची संधी दिली. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल बरीच चर्चा झाली होती. असे मानले जात होते की कर्णधार रोहित शर्मा दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह जाईल परंतु तसे झाले नाही. रोहितने कुलदीप यादवचा समावेश न करून सर्वांना आश्चर्यचकित केले असून त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपवर विश्वास दाखवला आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीत त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीमुळे बंगालच्या 29 वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपचा चेन्नई कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला होता. सामन्यापूर्वी असे मानले जात होते की फक्त दोन वेगवान गोलंदाज खेळतील आणि मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराहसोबत असल्याने आकाश दीपला बाहेर बसावे लागेल. मात्र तसे झाले नाही आणि पहिल्याच सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. आकाशने दुलीप ट्रॉफी सामन्यात भारत अ विरुद्ध भारत ब संघात भाग घेतला.ज्यामध्ये त्याने एकूण 9 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. अशा प्रकारे त्याने कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी आपला दावा ठामपणे मांडला होता.
आकाश दीपला यावर्षी कसोटी कारकिर्दीला सुरुवात करण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. आकाशने पदार्पणाच्या कसोटीत तीन बळी घेतले. त्याच बरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 32 सामन्यांत 22.86 च्या सरासरीने 116 विकेट घेतल्या आहेत. ज्यात त्याने 5 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबतच बॅटिंगमध्येही मोठे फटके मारण्याची क्षमता आहे.
हेही वाचा-
कॅरेबियन पाॅवर! स्टार खेळाडूचे 124 मीटरचे उत्तुंग षटकार; गोलंदाजाचे बत्या गुल..
ind vs ban: बांग्लादेशचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग इलेव्हन
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू