---Advertisement---

कोहलीच्या बॅटची जादू, आकाश दीपनं क्रिजवर येताच ठोकले खणखणीत षटकार!

On: सोमवार, सप्टेंबर 30, 2024 6:22 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने सामन्यावर आपली पक्कड मजबूत केली. बांगलादेशी संघाला पहिल्या डावात 233 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 9 विकेट्सवर 285 धावा करत आपला डाव घोषित केला. दरम्यान संघाला 52 धावांची आघाडी मिळाली. भारताच्या सर्वच फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. यादरम्यान भारताचा युवा खेळाडू आकाश दीपने (Akash Deep) फलंदाजी करताना खणखणीत 2 षटकार ठोकले.

यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) (51 चेंडूत 72 धावा), केएल राहुलने (KL Rahul) (43 चेंडूत 68 धावा), विराट कोहलीने (Virat Kohli) (35 चेंडूत 47 धावा), शुबमन गिलने (Shubman Gill) (36 चेंडूत 39 धावा), कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) (11 चेंडूत 23 धावा) केल्या, तर आकाश दीपने (Akash Deep) (5 चेंडूत 12 धावा) केल्या. दरम्यान त्याने 2 गगनचुंबी षटकार ठोकले. या सामन्यादरम्यान भारताने कसोटी डावात सर्वात वेगवान 50, सर्वात वेगवान 100 आणि जलद 150 धावा करण्याचा रेकाॅर्डही केला.

वास्तविक आकाश दीपने (Akash Deep) शाकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) चेंडूवर 2 षटकार मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 34व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने समोरच्या दिशेने उंच फटका मारला. चेंडू थेट सीमारेषेबाहेर पडला. शाकिबच्या पुढच्या चेंडूवर त्याने दुसरा षटकार ठोकला. पण स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आकाश दीपला त्याची बॅट भेट दिली होती आणि त्याच बॅटने आकाशने खणखणीत 2 षटकार ठोकले हे हे पाहून कोहलीला देखील आनंद झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या तुफानापुढे बांगलादेशची अवस्था खराब, कानपूर कसोटी रोमांचक वळणावर
भारताची खतरनाक फलंदाजी! असा पराक्रम पुन्हा होणे नाही, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडलं
एकमेव, अद्वितीय किंग कोहली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, क्रिकेटच्या देवालाही मागे टाकलं!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---