विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. या दिल्ली संघात अॅलेक्स कॅरीचा देखील समावेश होता. त्यामुळे त्याला पॉन्टिंगचे मार्गदर्शन मिळाले आहे.
आयपीएल दरम्यान पॉटिंगच्या देखरेखीखाली खेळाच्या ‘छोट्या मोठ्या तांत्रिक’ बाबींवर काम केल्यामुळे, भारताविरुद्ध टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पुन्हा मिळण्याची कॅरीला आशा आहे.
कॅरीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांना सांगितले की, ‘मला प्रथमच आयपीएलमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि दिल्लीचा प्रशिक्षक म्हणून पॉन्टिंग आणि काही इतर नामांकित लोकांमुळे ते दोन महिने माझ्यासाठी चांगले गेले.’
आयपीएलच्या अनुभवाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘गेल्या वर्षी विश्वचषकात पॉन्टिंग यांच्या बरोबर संघात कामगिरी करण्याचे माझे भाग्य लाभले होते आणि त्यांच्याशी माझे चांगले संबंध बनले. ते एक चांगले खेळाडू होते, आणि ते एक उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. ते अगदी लहानात लहान दोषही फार लवकर पकडतात.’
सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या अखेरच्या सामन्यात खराब फॉर्ममुळे या 29 वर्षीय खेळाडूला वगळण्यात आले होते. आयपीएलमध्ये त्याची कामगिरीही खास नव्हती. त्याने तीन सामन्यात मात्र 32 धावा केल्या. पण त्याला भारताविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या 18 जणांच्या संघात समावेश केला आहे.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने सुरू होईल. त्यानंतर टी-20 मालिकेचा पहिला सामना 4 डिसेंबरला खेळला जाईल. 6 डिसेंबरला दुसरा आणि 8 डिसेंबरला तिसरा टी20 सामना होईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: वृद्धिमान साहा दुखापतीतून सावरला? नेटमध्ये सुरु केला सराव
डेविड वॉर्नरच्या मधव्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाण्यास सज्ज
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी