सध्या जगभरात विविध टी20 लीग खेळल्या जातात. या लीग क्रिकेटच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचे मत अनेक दिग्गज व्यक्त करतात. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानेदेखील नुकतेच युवा खेळाडू पैशाकडे आकर्षित होऊन टी20 खेळत असल्याचे म्हटले. याचे ताजे उदाहरण आता इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर ऍलेक्स हेल्स याच्या रूपाने समोर आल्याचे दिसत आहे.
इंग्लंड क्रिकेट संघ मार्च महिन्यात बांगलादेश विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे.1 ते 14 मार्च दरम्यान उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेतून ऍलेक्स हेल्स याने माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. यादरम्यान तो पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग खेळताना दिसेल.
हेल्स हा मागील अनेक वर्षांपासून पीएसएल खेळताना दिसतो. पीएसएलमधील प्रमुख संघ असलेल्या इस्लामाबाद युनायटेड संघाशी त्याचा करार आहे. त्याला या स्पर्धेत खेळण्यासाठी दरवर्षी दीड कोटींची रक्कम मिळत. मात्र, त्याने पैशासाठी देश सोडल्याच्या या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. पीएसएलचा आगामी हंगाम 13 फेब्रुवारी ते 19 मार्च या काळात खेळला जाणार आहे.
हेल्स हा सातत्याने चर्चेत असतो. 2019 मध्ये शिस्तबंगाच्या कारवाईनंतर त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. ओएन मॉर्गन इंग्लंडचा कर्णधार असताना तो सलग तीन वर्ष संघा बाहेर राहिला. मात्र, मॉर्गन याने संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर जोस बटलरने कर्णधार होताच त्याला संघात जागा बनवून दिली. त्याने टी20 विश्वचषकात आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. बटलरसह सलामीला येत त्याने नेहमीच आक्रमक सुरुवात दिली. त्याने विश्वचषकात 42.40 च्या सरासरीने 242 धावा केल्या होत्या. इंग्लंडला विश्वचषक विजेता बनवण्यात त्याची भूमिका महत्त्वाचे राहिले.
(Alex Hales Play PSL Ahead Limited Overs Series Against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“युवा खेळाडूंनी धोनीकडून शिकावे”, माजी प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया